LOCKDOWN | डिचोलीत 5 दिवस पूर्ण लॉकडाऊन

सभापती राजेश पाटणेकरांची माहिती; बुधवार ५ ते रविवार ९ मे पर्यंत शहरातील सर्व व्यवहार पूर्ण बंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोलीः बुधवार ५ ते रविवार ९ मे पर्यंत डिचोलीतील सर्व व्यवहार पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आल्याची माहिती सभापती राजेश पाटणेकर यांनी दिली. बुधवार हा डिचोली बाजाराचा दिवस असून एकही दुकान, भाजीपाला व इतर कोणताही व्यवहार खुला नसेल. तसंच रविवारपर्यंत हा पूर्ण लॉकडाऊन असेल, असं पाटणेकरांनी सांगितलंय.

अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार

फार्मासी, पेट्रोल पंप व हॉस्पिटल्स या अत्यावश्यक सेवा सुरू असतील. बाकी सर्व व्यवहार पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचं पाटणेकरांनी सांगितलं. पालिका मंडळ, पोलीस, मामलेदार तसंच डिचोली व्यापारी संघटना यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय झाला असल्यानं त्याला सर्व घटकांनी सहकार्य करावं, असं आवाहन पाटणेकर यांनी केल.

जनजागृती करून सहकार्याचं आवाहन

मंगळवारी संध्याकाळी ४ वाजता पालिकेतील कर्मचारी, सभापती, तसंच नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्यासह सर्व नगरसेवक बाजारात फिरून डिचोलीवासीयांना या लॉकडाऊनला सहकार्य करण्याचं आवाहन करणार असल्याचंही पाटणेकरांनी सांगितसं.

हेही वाचाः कोविड काळात गोव्यातील 11 कुटुंबांनी गमावले 1 पेक्षा जास्त सदस्य

डिचोलीत कोविड पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1 हजाराच्या पार

डिचोली परिसरात एक हजाराहून अधिक कोविड रुग्ण संख्या असून परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्ण खुले आम फिरत असल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे हा पूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आसा असून सर्वांनी याला सहकार्य करावं, असं आवाहन राजेश पाटणेकर तसंच कुंदन फळारी यांनी केलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!