लॉकडाऊनच्या निर्णयाचे स्वागत, पण…

आम आदमी पार्टीने केली महत्त्वाची सूचना

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : मुख्यमंत्र्यांनी पुढील चार दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केलंय. या निर्णयाचे स्वागत आम आदमी पार्टीने केले आहे. यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार कमी होईल. मात्र अतिरिक्त बेड सुविधा तयार करणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करणे आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा आढावा घेणे आवश्यक आहे, असे आपचे नेते राहुल म्हांबरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी लोकांना एकत्र न जमण्याचे तसेच गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री आणि मंत्री/आमदारांनी याबाबत काटेकोरपणे पालन करून स्वतः जनतेसमोर एक उदाहरण ठेवावे, अशी अपेक्षा म्हांबरे यांनी व्यक्त केली आहे. साखळी येथील पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी गर्दीत केले. हे आश्चर्यकारक आहे. सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात एकीकडे सामान्य जनता होरपळत असताना मुख्यमंत्री प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात मग्न आहेत, हे लाजीरवाणे आहे, अशी टीका म्हांबरे यांनी केली आहे.

आपने मुख्यमंत्र्यांना या संकटाला तोंड देण्याबाबत सूचना आधीच दिलेल्या आहेत. घरगुती विलगीकरण आणि ऑक्सिमीटर पुरवण्याबाबत या सूचना होत्या. आपने चर्चेसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. मात्र मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारच्या मनात गोव्यातील लोकांबाबत चिंता नव्हती, तर कॅसिनो आणि नाईट क्लबची चिंता होती, असे म्हांबरे म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!