मायकल लोबोंच्या हस्ते ‘जीएसआरएलएस’खाली मसाला विभागाचे उद्घाटन

वनमावळिंगे कुडचिरे येथे अनावरण; महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवणं जीएसआरएलएमचा उद्देश

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोलीः ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो यांनी मयेचे आमदार प्रवीण झाट्ये, ग्रामीण विकास खात्याच्या संचालक मीना गोलतेकर आणि डिचोलीचे बीडीओ श्रीकांत पेडणेकर यांच्या उपस्थितीत वन-मावळिंगे कुडचिरे येथील स्वंयसहाय्य गटाच्या मसाला युनिटचं उद्घाटन केलं. वनमावळिंगे कुडचिरे येथील संध्या कुडतरकर या मसाला पाऊंडिंग मशीन आणि ग्रेन पाऊंडिंग मशीन यशस्वीरित्या चालवून स्वंयसहाय्य गटातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देतात.

हेही वाचाः मांद्रे मतदारसंघात काँग्रेसचे दोन गट कार्यरत

गोवा राज्यातील ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना लाभ मिळवून देणं

गोवा राज्य ग्रामीण उपजीविका मिशनचा  (जीएसआरएलएम) मुख्य उद्देश म्हणजे गोवा राज्यातील ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना लाभ मिळवून देणं हा आहे. ग्रामीण भागातील गरीब महिलांचं जीवनमान उंचावणं आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणं हेही त्याचं उद्दिष्ट आहे. गोव्यातील ग्रामीण कुटुंबांना विशेषत: महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवणं हा देखील मिशनचा उद्देश आहे.

हेही वाचाः कृषी हाच गोव्याचा शाश्वत व्यवसाय

बचत गटांना रिव्हॉल्व्हिंग फंड म्हणून ३.३५ कोटी रुपयांची तरतूद

जीएसआरएलएम राज्यातील सर्वात दुर्गम भौगोलिक ठिकाणी ३८,५९०/ – पेक्षा जास्त घरांपर्यंत पोहोचलं आहे. ग्रामीण भागातील गरिबांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे. आजपर्यंत जीएसआरएलएम २,९७९ बचत गटांसह कार्यरत असून ३८.५९० कुटुंबांपर्यंत पोचलं आहे. अंमलबजावणीदरम्यान जीएसआरएलएमने स्वयंसहाय्य गटाच्या सदस्यांना शेती आणि बिगर शेती क्षेत्रात ग्रामीण भागातील उदरनिर्वाहासाठी मदत केली आहे. संपूर्ण गोव्यातील वेगवेगळ्या बचत गटांना रिव्हॉल्व्हिंग फंड म्हणून ३.३५ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध केली आहे. संपूर्ण गोव्यातील विविध ग्रामीण संस्थांना १.६७ कोटी रुपयांची रक्कम सामाजिक गुंतवणूक निधी म्हणून देण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!