थेट वाळपईतून LIVE : विश्वनाथ नेने यांचा ग्राऊंड रिपोर्ट, दिवसभरात काय काय घडलं?

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी
वाळपई : दिवसभर वाळपईमध्ये तणावाचं चित्र पाहायला मिळालंय. दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. शेळ-मेळावलीतील आंदोलनामुळे वाळपईमध्ये सकाळपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. उच्चस्तरीय बैठकही पार पडली. नेमकं दिवसभर वाळपईमध्ये काय घडलं, पाहा आमचे चिफ रिपोर्टर विश्वनाथ नेने यांचा ग्राऊंड रिपोर्ट…
हेही वाचा – ‘आयआयटी होणारच! कुणालाही कायदा हातात घेता येणार नाही’
पाहा व्हिडीओ –
संभाव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाळपईत मोठा पोलिस फौजफाटा
दिवसभर वाळपईमध्ये मोठा फौजफाटा तैनात होता. दरम्यान आज सकाळपासून राज्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी आधीपासून वाळपईत दाखल झाले आहेत. काल वाळपई पोलिस स्थानकात मेळावली वासियांनी धडक मोर्चा काढला होता. पोलिसानं महिलेच्या पोटावर पाय दिल्याच्या आरोपासून सर्व आंदोलक खवळे होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिस महासंचालकांनी वाळवईमध्ये तातडीची बैठक घेतली आहे. तर दुसरीकडे आंदोलकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बुधवारी रात्रीच समाज कार्यकर्ते विश्वेश प्रभू यांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची म्हापशात रवानगीही करण्यात आली आहे.