‘अर्थ’ बजेटचा | LIVE Updates | अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या ताज्या घडामोडी #Budget2021 #Goa

हे Page सातत्यानं Update होत आहे! कृपया वाचून झाल्यानंतर पुन्हा Refresh करा.

Goan Varta Live | प्रतिनिधी

जमीन मालकीप्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

गोवा भूमीपुत्र अधिकारीता योजनेची घोषणा

जमीन मालकीप्रश्न सोडवण्यासाठी खास योजना

उत्तर आणि दक्षिण गोव्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन वेगवेगळ्या समित्या नेमणार

अंगणवाडी सेविकांना 7 हजारांवरुन 10 हजार वेतनाची घोषणा

अंगणवाडी सेविकांना स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करणार- मुख्यमंत्री

आदिवासी महिलांना सॅनिटरी पॅड तयार करण्याचं प्रशिक्षण देणार, त्यासाठी 5 कोटींची तरतूद

दिव्यांगांसाठी दिव्यांग रथ वाहनाची योजना

एससी, ओबीसी आणि आर्थिक मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना

आर्थिक मागास वर्गासाठी सामाजिक योजनांचाही लाभ मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

लाडली लक्ष्मीसह सर्व सामाजिक योजनांसाठी मुख्यमंत्र्यांकडून भरीव तरतूद

गोव्याला फिशरी हब करण्यासाठी केंद्राकडून 400 कोटींची हमी

मासेमाऱ्यांचा किसान क्रेडिट कार्ड योजनेत समावेश, मासेमाऱ्यांसाठी 14 कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा

कृषी श्रेत्रासाठी तब्बल 489.19 कोटी रुपयांची तरतूद

41,900 कृषी कार्डचं राज्यातील शेतकऱ्यांना वाटप

संजीवनी साखर कारखान्यासाठी 15 कोटींची तरतूद

शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळण्यासाठी 15 कोटींची तरतूद

41,900 कृषी कार्डचं राज्यातील शेतकऱ्यांना वाटप

2 हजारपेक्षा जास्त सरकारी पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू – मुख्यमंत्री

आयपीबीच्या माध्यमातून 37 हजार खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्या तसेच 11 हजार सरकारी नोकऱ्या उपलब्ध होतील. 2 हजार नोकऱ्यांसाठी जाहिराती प्रसिद्ध

तिळारी धरणातून अखंडित पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन उभारणार

तिळारी धरणातून अखंडित पाणी पुरवठ्यासाठी 23 किमी. ची पाईपलाईन उभारणार, 122 कोटींची तरतूद, महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या बैठकीत प्रस्तावाला मान्यता – मुख्यमंत्र्यांची घोषणा

गोवा राज्य खाण महामंडळ सुरू करणार

मुख्यमंत्र्यांची खाणी सुरू करण्यासाठी मोठी घोषणा

गोवा खाण महामंडळ स्थापन करणार- मुख्यमंत्री

गोवा मेरीटाईम बोर्डसाठी 1 कोटींची तरतूद

गोवा मेरीटाईम बोर्डसाठी 1 कोटींची तरतूद, ग्रीन एनर्जीला चालना देण्यासाठी प्रोत्साहन देणार, 100 मेगावॅट सोलर वीज प्रकल्प उभारणार, सोलर वीज प्रकल्पासाठी 60 कोटींची तरतूद, केंद्रांच्या मदतीनं फ्लोटींग सोलर प्लांट उभारणार

मोपा विमानतळाचं 21% काम पूर्ण- मुख्यमंत्री

तिळारीचं पाणी पाईपलाईनं आणण्यासाठी 122 कोटींची तरतूद

म्हादईवरुन राजकारण करु नका, मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना आवाहन

म्हादईचं पाणी वळवण्याच्या प्रकाराला आम्हीच आव्हान दिलं- मुख्यमंत्री

म्हादईबाबत जराही तडतोड करणार नाही- मुख्यमंत्री

गोव्यात शंभर टक्के नळजोडणी झाल्याचा मुख्यमंत्र्यांचा बजेट सादर करताना दावा

पहिल्यांदाच आमदार निधीची घोषणा, आमदार निधीसाठी 100 कोटींची तरतूद

आरोग्य खात्यासाठी 1 हजार 719.98 कोटी रुपयांची तरतूद

50 वर्षांच्या कार्यकाळात काही चुकलं असेल तर माफ करा- प्रतापसिंह राणे

4.30 वाजता बजेट सादर होणार

आमदारकीची ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल सभागृहात मांडलेला अभिनंदन प्रस्ताव प्रतापसिंह राणे यांनी नाकारला, सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांकडून सभागृहात अभिनंदन सुरू, तर छपाईचे काम लांबल्यामुळे तसेच सभागृहाचे कामकाज लांबणार असल्याने राज्याचा अर्थसंकल्प ४.३० वाजता सादर होणार.

राणेंना विधानसभेत 50 वर्ष पूर्ण! अशी आहे अपराजित कारकिर्द

विधानसभेत राणेंच्या अभिनंदनाचा प्रस्ताव

ब्युरो: पर्ये मतदारसंघात निर्विवाद वर्चव राखलेल्या राणेंची कारकीर्द मोठी आहे. दरम्यान, सकाळीच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी त्यांची भेट घेऊन त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

आपल्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी कोणकोणत्या महत्त्वाच्या पदांवर काम केलंय आणि एकूणच त्यांची राजकीय कारकीर्द कशी होती, त्यावर एक नजर टाकुयात….

गोव्यासाठी योगदान

कदंब वाहतूक महामंडळ
गोवा विद्यापीठ
गोवा पर्यटन विकास महामंडळ
गोवा औद्यागिक वसाहती
औद्योगिक प्रशिक्षण संस्था
उच्च शिक्षणाला उभारी
जलसिंचनाचे प्रकल्प
ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा
पक्क्या आणि रुंद रस्त्यांचे जाळं
वेर्णा औद्योगिक वसाहतीची उभारणी
नेहरु स्टेडियम, फातोर्डा
२४० खाटांचे आयडी हॉस्पिटल, फोंडा
गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट
इंटरनॅशनल सेंटर गोवा
हॉटेल मॅनेजमेन्ट इन्स्टिट्यूट, पर्वरी
तारांकीत पर्यटनाला प्रोत्साहन
साखळी महाविद्यालय
गोवा विधानसभा संकुलाची उभारणी
भव्य चोगम इव्हेंट
अंजुणा धरण
रवींद्र भवन, साखळी

गोवा विधानसभेतला ऐतिहासिक क्षण- मुख्यमंत्री

वेगवेगळी पदं भुषवलेल्या प्रतापसिंग राणेंची कारकिर्द ऐतिहासिक आहे, त्यांची अपराजित कारकिर्द हा विधानसभेतला एक ऐतिहासिक क्षण आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो, असं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी म्हटलंय.

LIVE Video | खाण जमीन मालकीवर बजेटमध्ये होणार मोठी घोषणा?

प्रतापसिंह राणेंची विधानसभेत हाफसेन्च्युरी

प्रतापसिंह राणेंची विधानसभेत हाफसेन्च्युरी, विधानसभा कारकिर्दीला आज तब्बल 50 वर्ष पूर्ण केल्याबद्दल सर्व आमदारांनी केलं अभिनंदन

लोकशाहीची हत्या केली जातेय- विजय सरदेसाई

विजय सरदेसाईंची सरकारवर घणाघाती टीका, सरकार अधिवेशन रेटत असल्याचा आरोप, लोकशाहीची हत्या केली जात असल्याच असल्याचं म्हणत सरकारवर हल्लाबोल, सरकार उत्तर द्यायला टाळाटाळ करत असल्याची टीका, तर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचाही सरकारवर निशाणा, सरकार उत्तर देण्यास टाळाटाळ करत असल्यानं व्यक्त केला संताप

विधानसभा 15 मिनिटांसाठी तहकूब

प्रश्नोत्तराचा तास वाढवण्यासाठी ऍलिना साल्ढाणांची मागणी फेटाळली, विरोधकांचाही गदारोळ, अखेर विधानसभा 15 मिनिटांसाठी तहकूब

ऍलिना साल्ढाणा यांचा रेल्वे दुपदरीकरणावरुन सवाल

डिमार्ककेशनवर ऍलिसा साल्ढाणा यांचे सवाल, प्रशासनांनं प्रकल्प राबवताना नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप, रेल्वे दुपदरीकरणावरुन भाजप आमदार ऍलिना साल्ढाणांचा घरचा आहेर

सगळ्यांना विश्वासात घेणार – मुख्यमंत्री

मायनॉरिटी असतील किंवा इतर सर्व संस्थांना विश्वासात घेऊन सरकार राज्यात नवं शैक्षणिक धोरण राबवणार, मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन

कुणावरही अन्याय होणार नाही- मुख्यमंत्री

नवं शैक्षणिक धोरण राबवताना डायोसेशन शैक्षणिक संस्थांवर अन्याय होणार नाही, आमदार चर्चिल आलेमावांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच विधानसभेत आश्वासन

48 तासांत उत्तर द्या

मंत्र्यांना 48 तासांपूर्वी विधानसभेतील उत्तरे द्या. सभापती पाटणेकरांनी दिले मुख्य सचिवांना निर्देश

अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात

रोहन खंवटेही विधानसभेत दाखल – Video

पाहा Live Video – अधिवेशनाचं थेट प्रक्षेपण

अर्थसंकल्प अधिवेशनाआधी विजय सरदेसाई काय म्हणाले ऐका…

विजय सरदेसाई यांची भाजप सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका, तसंच गोव्यातील उद्योगांमध्ये स्थानिकांना ८० टक्के नोकऱ्या मिळण्यासाठी खासगी विधेयक विजय सरदेसाईंकडून विधानसभा सचिवांकडे सादर

अधिवेशनात किती प्रश्न?

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी आमदारांकडून ५६८ तारांकित, १,००३ अतारांकित असे एकूण १,५७१ प्रश्न. कोरोनामुळे अधिवेशनावेळी गॅलरीमध्ये निवडक अधिकाऱ्यांना प्रवेश, प्रेक्षक गॅलरी बंद राहणार.

किती दिवस चालणार अधिवेशनाचं कामकाज?

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान होळी, मॉन्डी थर्सडे, गुड फ्रायडे, गुढीपाडवा, आंबेडकर जयंती, शनिवार रविवारच्या सुट्ट्या असणार आहेत. या दिवसांमध्ये अधिवेशनाचं कामकाज चालणार नाही. दरम्यान 16 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनाच एकूण कामाचे दिवस फक्त 13 असणार आहेत. दरम्यान अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा संकुलाच्या आवारात कलम 144 म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

अधिवेशनासाठी एकूण 1 हजार 571 प्रश्न! अशी आहे अधिवेशनाची SOP –

विधानसभा परिसरात मंत्री आमदारांसोबत व्यक्तिगत कर्मचाऱ्यांची संख्या कमी असावी

सभापतींसोबत व मुख्यमंत्र्यांसोबत 8 कर्मचारी, मंत्र्यांसोबत 6 कर्मचारी, विरोधी पक्षनेत्यांसोबत 6 व आमदारांसोबत तीन कर्मचारी अपेक्षित

प्रत्येकाला मास्क अनिवार्य, सोशल डिस्टन्सिंग पाळणंही गरजेचं

सुरक्षा व्यवस्थेशी निगडीत व्यक्तींची गर्दी टाळावी

मागच्या बजेटमधील तब्बल इतक्या गोष्टी फक्त कागदावरच

पाहा गोवनवार्ता लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट –

मागच्या अर्थसंकल्पातील किती योजना मार्गी लागल्या?

विरोधी पक्षनेते दिगंबर कामतांनी सरकारला सवाल केलाय. मागच्या अर्थसंकल्पातील किती गोष्टींची बाबींची पूर्तता झाली, हे सरकारनं आधी सांगावं, असं म्हणत त्यांनी प्रमोद सावंतांवर निशाणा साधलाय. त्याचप्रमाणे गोवा लोकायुक्त कायद्याला मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. सोबतच काणकोणातील विद्यार्थीनीच्या अपहरणाचा प्रयत्न यावर लक्षवेधी सूचना मांडणार असल्याचंही ते म्हणालेत.

विधानसभा निवडणुकांआधीचा महत्त्वाचा अर्थसंकल्प, मुख्यमंत्री बजेटमधून महत्त्वाच्या घोषणा करण्याची दाट शक्यता, कोरोना महामारीत झालेलं नुकसान भरुन काढण्याचंही आव्हान

दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करणार

आज राज्याचा अर्थसंकल्प, 16 एप्रिलपर्यंत चालणार विधानसभेचं कामकाज

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!