LIVE | मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन
Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : पर्वरी येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाच्या सर न्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते आज होत आहे. यावेळी केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. व्ही. रमाणा, न्या. उदय उमेश ललित, न्या. अजय खानविलकर, न्या. डी. व्याय. चंद्रचूड, न्या. बी. आर. गवाय, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपानकर दत्ता, कायदा मंत्री नीलेश काब्राल, ऍडव्होकेट जनरल देवीदास पांगम, याच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे ६२ न्यायाधीश तसेच इतर मान्यवर उपस्थित आहेत.
गोवा खंडपीठाच्या नवीन इमारतीची आवश्यकता लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी पर्वरी येथे इमारत बांधण्यास मंजूरी दिली होती. इमारतीची पायाभरणी १९ डिसेंबर २०१३ रोजी स्व. पर्रीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती मोहित शाह यांच्या उपस्थितीत केली होती. ही इमारत ३१ डिसेंबर २०१८ रोजी पूर्ण होणार होती. ही इमारत गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळांतर्फे बांधण्यात आली आहे.
नवीन इमारतीत तळमजल्याशिवाय दोन मजले आहेत. इमारतीत ७ न्यायालये असणार आहेत. इमारतीत तळमजल्यावर सुमारे ३६१ चारचाकी आणि ४८ दुचाकी पार्किंगची सुविधा पुरविण्यात आली आहे. डिझेल जनरेटर, सौर यंत्रणा, बायो डायजेस्टर, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व इतर अत्याधुनिक सुविधा असणार आहेत.