मुख्यमंत्री LIVE : म्हादईवर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद

म्हादईप्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची महत्त्वाची पत्रकार परिषद

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : म्हादईप्रश्नी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची पत्रकार परिषद सुरु आहे. विरोधक विजय सरसाईंनी केलेल्या आवाहनानंतर प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिक मांडण्यास सुरुवात केली आहे.

काय आहे म्हादईचा प्रश्न?

म्हादईचं पाणी कर्नाटकात वळवण्यावरुन वाद आहे. या वादावर कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. या निर्णयाला गोवा सरकारनं आवाहन दिलं आहे. यावरुन गोव्यातील राजकारण पेटलं आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजपला धारेवर धरलंय. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाईंनी मुख्यमंत्र्यांना आवाहन दिलं होतं. येत्या 48 तासांत मुख्यमंत्र्यांनी कृती आराखडा सादर करावा, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत आपली सविस्तर भूमिका मांडली आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

1 म्हादईची क्षारता तपासण्यासाठी सगळ्यात आधी आपण पुढाकार घेतला. त्यावर केंद्रीय मंत्र्यांकडे सातत्यानं पाठपुरावा सुरु आहे. काही दिवासांपूर्वी पुर्नतपासणी पत्र लिहिलं आहे. आमचे मंत्र्यांनी देखील हा विषय लावून धरला आहे.

2 काँग्रेसच्या काळात या विषयाकडे साफ दुर्लक्ष करण्यात आलं. तेव्हा बेकायदेशीर मायनिंगमध्ये तेव्हाचे मुख्यमंत्री गुंग होते.

3 ज्यांच्याकडे म्हादईचं पाणी वळवण्यासंबंधी सरकारकडे सादर करावेत. आम्ही ते सर्व पुरावे कोर्टसमोर सादर करु. जेणेकरुन आमची बाजू अधिक भक्कम होण्यास मदत होईल.

4. जोपर्यंत म्हादईशीप्रश्नी सर्व परवानग्या मिळत नाही, तोवर म्हादईचं पाणी कर्नाटकला वळवता येणार नाही. याबाबत केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरांशी चर्चा झाली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!