साहित्यिक गोपाळराव मयेकर निवर्तले

वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा: ज्येष्ठ साहित्यिक, संत ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक, गोव्याचे माजी शिक्षण मंत्री आणि माजी खासदार प्रा. गोपाळराव मयेकर (८७) यांचं गुरुवारी निधन झालं. गणेशपुरी म्हापसा येथील ते रहिवासी होते. गेली काही वर्षं ते घरीच होते. तीन दिवसांपूर्वी तब्येत खालावल्यानं उपचारासाठी त्यांना गोमेकॉत दाखल केलं होतं. गुरुवारी रात्री ९च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी दुपारी १२ वा. येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी उषा, तीन विवाहित पुत्र, एक विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

हेही वाचाः हिमाचल प्रदेशचे राज्यपाल पोहोचले पंतप्रधानांच्या भेटीला

ज्ञानेश्वरीवरील त्यांनी लिहिलेला ग्रंथ प्रसिद्ध

ज्ञानेश्वरीवरील त्यांनी लिहिलेला ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांनी भगवद्गीतेवर इंग्रजी भाषेत ग्रंथही लिहिला आहे. त्यांच्या अमृत महोत्सवनिमित्त विद्यार्थी, मित्र आणि हिंतचिंतक यांनी ‘सोन्याचा पिंपळ’ हा मयेकरांवरील गौरवग्रंथ प्रसिद्ध केला होता.

हेही वाचाः बांदासह अनेक गावं पाण्यात, आंबोलीत दरड कोसळली !

निधनाबद्दल मंत्र्यांकडून शोक व्यक्त

त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, एड. रमाकांत खलप यांच्यासह मान्यवरांनी दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचाः मुंबई-गोवा महामार्ग ठप्प ; कणकवली-वागदेत पुन्हा पाणी

थोडक्यात जीवनप्रवासः

मयेकर सरांचा जन्म २६ मार्च १९३४ साली मुंबई येथे झाला.

१९६७ ते १९७२ म्हापसा मतदारसंघाचे आमदार.

१९६७ ते १९७० भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री.

१९८७ मध्ये गोमंतक मराठी अकादमीचे पहिले अध्यक्ष.

१९८९ मध्ये लोकसभा निवडणुकीत मगोचे खासदार म्हणून निवड.

१९९८ साली अकादमीच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड.

१९९८ मध्ये फोंडा येथे भरलेल्या २३व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

१९७४ ते १९८२ देवगड येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य

१९८२ ते १९९५ मध्ये म्हापसा येथील ज्ञानप्रसारक मंडळाच्या बांदेकर कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य_
मिळालेले पुरस्कार

महाकवी कालिदास

पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनातर्फे स्वामी स्वरूपानंद पुरस्कार

गोमंत शरद

हा व्हिडिओ पहाः Super Exclusive | विश्वजीत राणेंकडून पूरस्थितीची पाहणी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!