#Budget2021 | अर्थसंकल्पाचे थेट संकेत, दारु महागणार कारण…

अर्थमंत्र्यांनी सादर केला अर्थसंकल्प

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनानंतरचं पहिलंच बजेट अर्थमंत्र्यांनी सादर केलं. आणि तळीरामांना दणका दिला. कारण अर्थसंकल्पात सादर केलेल्या काही महत्त्वाच्या घोषणांमुळे दारु महागणार आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना जोरदार झटका बसणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२१मध्ये काही क्षेत्रांना मदतीचा हात देण्यात आला आहे. तर काही गोष्टी चांगल्याच महागणार आहेत.

मद्य आणि तत्सम पेय म्हणजे बिअर इत्यांदीच्याच्या किंमतीमध्ये बजेटमध्ये घसघशीत वाढ जाहीर करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये अल्कोहोलयुक्त पेयांवरील सेसच्या दरात तब्बल १०० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जाणकरांच्या म्हणण्यानुसार, या अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीमुळे मद्य आणि मद्ययुक्त पेय यांच्या किंमती वाढणार असल्याचं स्पष्ट आहे.

तुलनेने गोव्यात स्वस्तच

इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात दारुचे दर बरेच कमी आहेत. त्यामुळे अनेकांची गोव्यात येऊन मद्यप्राशन करण्याला पसंती असते. मात्र आता संपूर्ण देशभरातील दारुची किंमत महागणार असल्यानं राज्यातील दारुच्या किंमतीवरही त्याचे परिणाम जाणवणार असल्याचं बोललं जातंय येत्या काळात नेमकी अल्कोहोयुक्त पेयांची किंमत किती वाढते, हे पाहणं आता महत्त्वाचंय.

म्हणजे पर्यटक वाढणार तर..?

देशभरात कितीही दारु महागली तर तुलनेने गोव्यात दारु स्वस्तच राहणार असल्यानं आता राज्यात पर्यटकांचा ओढा आणखी वाढेल, अशीही शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे येत्या काळात पर्यटकांची संख्या राज्यात वाढून महसुलातही वाढ होईल, असा दावा केला जातो आहे. कोरोना काळातही गोव्यात पर्यटकांचा ओढा होताच. वर्षाअखेरीस आलेल्या पर्यटकांच्या संख्येनं लोकांच्या गोव्याला पसंती असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे जरी दारु महागणार असली, तरी ही बाब राज्यासाठी फायदेशीर ठरणार का, हे पाहणंही तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे.

मोबाईलही महागणार

महत्त्वाचं म्हणजे येत्या वर्षात मोबाईल फोन महागणार आहेत. कारण मोबाईल फोन्सच्या काही पार्ट्सवर सरकारनं कर लावले आहेत. त्यामुळे मोबाईल निर्मितीची प्रक्रिया महागेल, यावर शिक्कामोर्तब झालंय. म्हणूनच येत्या काळात मोबाईल फोन्सचे दर वाढणार आहे, हे सुद्धा अर्थसंकल्पातून स्पष्ट झालं आहे.

पेट्रोल-डिझेलला दिलासा नाहीच

दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दरांवर कोणताही दिलासा अर्थसंकल्पातून मिळालेला नाही. त्याचप्रमाणे सरकारनं करप्रणालीमध्ये कोणातीही घोषणा या अर्थसंकल्पात केली नसल्यानं अनेकांची निराशा झाली. कोरोना महामारीचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसल्याचं अर्थमंत्र्यांनी यावेळी ठळकपणे नमूद केलं. मात्र २०२१-२२च्या अर्थसंकल्पातून कोणत्याही ठोस आणि आकर्षक घोषणा करण्याचं अर्थमंत्र्यांनी टाळल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलंय.

हेही वाचा – सोप्या भाषेत अर्थसंकल्प – सविस्तर विश्लेषण

वृद्धांना बजेटमधून मोठा दिलासा, अर्थमंत्र्यांनी केली ही घोषणा

100 नव्हे, गोव्याला 300 कोटींचं पॅकेज

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!