‘या’ आदर्श कार्यात सहभागी होऊया

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : अयोध्येत रामजन्मभूमीवर उभारण्यात येणाऱ्या भगवान श्री राम मंदिराबद्दल रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मंदिर बांधण्यासाठी निधी उभारणीची मोहीम १५ जानेवारीपासून सुरू होणारेय. मात्र अनेकांनी आतापासूनच देणगी देण्यास सुरुवात केलीये. या कार्यात योगदान देण्यासाठी कुंडईचे सद्गुरू ब्रह्मेशनंदाचार्य स्वामींनी यांनी गोमंतकीयांना आवाहन केलंय.

या आदर्श कार्यात सहभागी होऊया

अयोध्या भूमीवर भव्य श्रीराम मंदिर निर्माण कार्य होतं आहे. श्रीराम हे आपले आदर्श या आहेत. जसं रामसेतूसाठी प्रत्येकानं आपापल्या परीनं सेवा केली, त्याचप्रकारे आजसुद्धा अशाच प्रकारची सेवा दानाच्या माध्यमातून करायची संधी प्राप्त होतेय. त्यामुळे श्रीराम मंदिर निर्माणासाठी सर्वांनी हे दान प्रभू रामचंद्रांच्या श्रीचरणी अर्पण करावं, असं आवाहन सद्गुरू ब्रह्मेशनंदाचार्य यांनी केलंय. सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामींनी श्री राममंदिर कार्यासाठी मोठं योगदान दिलंय. येणाऱ्या पिढीला श्रीरामांचं चरित्र समजायला हवं यासाठी सर्वांनी या कार्यात सहभागी व्हायला हवं. त्यामुळे पद्मनाभ शिष्य संप्रदाय, राष्ट्रीय स्वयं सेवक संघ, श्रीदत्त पद्मनाभ पीठ, विश्व हिंदू परिषद, देवस्थान पदाधिकारी अशा वेगवेगळ्या हिंदू संस्था, विविध धार्मिक संघटनांचं स्वयंसेवक घरोघरी येणार आहेत. श्रीराम मंदिरासाठी प्रत्येकाचा खारीचा वाटा आवश्यक आहे. आपण दान दिलेला निधी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट या खात्यात जमा होणार आहे, असं ब्रह्मेशनंदाचार्य स्वामींनी सांगितलंय.

कशी देऊ शकतो देणगी?

योध्या भूमीवर भव्य श्रीराम मंदिर निर्माण कार्यात आपला खारीचा वाटा देण्यासाठी २० हजारांपेक्षा जास्तीची रक्कम केवळ चेक किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे दिली जाऊ शकते. एसबीआय, बॅंक ऑफ बडोदा आणि पीएनबी बॅंकेच्या खात्यात थेट निधी जमा करू शकतो. तसंच त्याची पावती ऑनलाइन मिळवू शकता. राम मंदिर निर्माणासाठी दिलेली रकमेवर आपल्या आयकरामध्ये सूट मिळणार आहे. श्री राम मंदिर निर्माणासाठी चेक किंवा ड्राफ्टद्वारे दिली जाणारी राशी ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’च्या नावावर देता येणार आहे. राम मंदिराच्या बांधकामास आर्थिक सहाय्य करू इच्छित राम भक्त ऑनलाइन निधी हस्तांतरित करू शकतात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!