चला, पेडणे मतदारसंघ आरोग्यमय करू

मगोप नेते प्रवीण आर्लेकरांचं आवाहन

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः पेडणेकर सुखी, निरोगी आणि आरोग्यमय असावे या साठी पेडणे मतदारसंघात अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत. त्यात कडधान्य वितरण योजना, स्टीमर वितरण योजना, ऑक्सिकॅन वितरण योजना, दोनचाकी पायलट आणि पेडणेतील पत्रकारांसाठी रेनकोट योजना इ. या वेळी पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरिया सारखे रोग सुरू होणार, तर दुसऱ्या बाजूने कोरोनाचं महासंकट. अशा परिस्थितीत लोकांचा जीव वाचवा तसंच त्यांना डेंग्यू आणि मलेरिया सारख्या रोगापासून लांब ठेवण्यासाठी ‘डास निर्मूलन फवारणी’ संपूर्ण पेडणे मतदारसंघात सुरू केली आहे. गेल्या अकरा दिवसांपासून कोरगाव गावातून सुरू झालेली फवारणी पेडणे विर्नोडा गावात पोचली आहे, अशी माहिती मगो पक्षाचे पेडणे नेते प्रवीण आर्लेकर यांनी दिली.

हेही वाचाः खळबळ! मुख्यमंत्र्यांच्या नावे तयार केली बनवाट फेसबुक आयडी; मागितले पैसे

संपूर्ण पेडण्यात फवारणी करणार

‘डास निर्मूलन फवारणी’ करण्यासाठी पेडणे मतदारसंघात चार कामगार नेमण्यात आलेत. त्यांच्या मदतीने संपूर्ण मतदारसंघात फवारणी केली जात आहे. जोपर्यंत सर्व गावांमध्ये फवारणी होत नाही तोपर्यंत हा उपक्रम चालूच राहील, अशी माहिती आर्लेकरांनी दिली.

हेही वाचाः ‘आप’च्या ‘प्रतिमा’ला पोलिसांकडून समन्स; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

संध्याकाळच्या वेळेत फवारणीचं काम सुरू

संध्याकाळी चार वाजता फवारणीच्या कामाला सुरुवात केली जाते. ज्या भागात फवारणी केली जाते तेथील घरांची दारं बंद करण्याची विनंती केली जाते. जेणेकरून धुराचा त्रास होत नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!