फूट पाडणाऱ्यांच्या विरोधात लढूया

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी: फोंडा पालकिचे माजी नगरसेवक आर्विन सुवारीस आणि कुर्टी पंचायतीचे माजी पंच सदस्य नारायण नाईक यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
हेही वाचाः५० कोटी घेऊन नवीन पक्षात प्रवेश !…
काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित
यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ निरीक्षक पी. चिदंबरम, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, फोंड्याचे उमेदवार राजेश वेरेकर, फोंडा गटाध्यक्ष जॉन पॅरेरा, ट्रिबोलो सौझा आदी उपस्थित होते.
हेही वाचाः कारची झाडाला धडक बसल्याने अपघात
सुवारीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते : राजेश वेरेकर
राजेश वेरेकर म्हणाले की, आर्विन सुवारीस यांच्याकडे काँग्रेसच्या माजी नेतृत्वाने दुर्लक्ष केले आणि त्यामुळे ते इतर पक्षांसोबत राहिले. आर्विन सुवारीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. पण आज ते आमच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता पुढे नेण्यासाठी आणि पक्ष वाढण्यास मदत करण्यासाठी पुन्हा काँग्रेसमध्ये आले आहेत.” असे वेरेकर म्हणाले.
हेही वाचाः माझ्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर…
वेरेकर विधानसभा निवडणुकीत विजयी होतील : आर्विन सुवारीस
आर्विन सुवारीस म्हणाले की पी चिदंबरम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने त्यांना खुप बरे वाटले. ‘आज मला माझा सन्मान झाल्या सारखे वाटले कारण मला पी चिदंबरम यांचे नेतृत्व नेहमीच आवडले. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मी प्रवेश केला आहे. राजेश वेरेकर विधानसभा निवडणुकीत विजयी होतील, असा विश्वास असल्याचे आर्विन सुवारीस म्हणाले. “भाजपला पराभूत करण्यासाठी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने एकत्र येण्याची गरज आहे.” असे ते म्हणाले.
हेही वाचाःकंटेनर आणि दुचकीच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू
गोव्याने एकजूट राहिले पाहिजे
“गोवा हे शांतताप्रिय राज्य आहे. मुक्तीनंतर आम्ही ओपिनियन पोलचा सामना केला आणि गोव्याला महाराष्ट्रात विलीन होण्यापासून वाचवले. आज ओपिनियन पोल सारखीच परिस्थिती आहे, त्यामुळे जे आपल्यात फूट पाडू पाहत आहेत त्यांच्या विरोधात आपल्याला लढावे लागेल. गोव्याने एकजूट राहिले पाहिजे आणि सर्व समुदायांचे संरक्षण केले पाहिजे.’’ असे आर्विन सुवारीस म्हणाले.
इतर मतदारसंघासह फोंड्यातील जागाही जिंकणार : गिरीश चोडणकर
यावेळी बोलताना गिरीश चोडणकर म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच गोव्यातील जातीय सलोख्याचे रक्षण केले असून यापुढेही सर्व समाजाचे रक्षण करणार आहे. “आम्ही इतर मतदारसंघासह फोंड्यातील जागाही जिंकणार आणि स्थिर सरकार स्थापन करणार.” असे चोडणकर म्हणाले.