परवानगी न दिल्यास साखळी उपोषण करू

कुडचडे मतदार संघातील सामाजिक कार्यकर्ते अमित पाटकर यांचा इशारा

यश सावर्डेकर | प्रतिनिधी

सावर्डेः आगामी विधानसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार आणि कुडचडे मतदार संघातील सामाजिक कार्यकर्ते अमित पाटकर यांनी कुडचडे गट काँग्रेस आणि कुडचडे मधील नागरिकांनी आसपासच्या मतदारसंघातील लोकांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा चालविण्यास परवानगी न दिल्याबद्दल काकोडा आरोग्य केंद्रावर मोर्चा काढला. येत्या चार दिवसात रुग्णवाहिकेसाठी परवानगी न मिळाल्यास साखळी उपोषण करण्याचा इशारा कुडचडे गट काँग्रेस देण्यात आला. 

हेही वाचाः सरकारने गोवा भूमिपुत्र अधिकार कायदा रद्द करावा

अन्यथा साखळी उपोषण करू

यावेळी बोलताना अमित पाटकर म्हणाले, रुग्णवाहिका लोकांच्या सेवेसाठी आहे आणि त्यामध्ये सर्व सपोर्ट सिस्टीम विनामूल्य आहे. वेळेवर योग्यरित्या पालन न करण्यात आलेली कारणं सांगून परवानगी देण्यात आलेली नाही. आम्ही परवानगी देण्यास अल्टिमेटम दिला होता. कुडचडे गट काँग्रेस आणि कुडचडे मधील नागरिकांनी मोर्चात सहभागी होऊन आरोग्य अधिकाऱ्याला प्रश्न केला. तरीही परवानगी न मिळाल्यास कुडचडे नागरिक परवानगी मिळेपर्यंत आरोग्य केंद्रासमोर साखळी उपोषणाला बसतील, असं पाटकर म्हणाले.

विद्यामान सरकार उद्धट

यावेळी बोलताना माजी नगरसेवक मनोहर नाईक यांनी शोक व्यक्त केला, की गोव्याने असे असंवेदनशील आणि उद्धट सरकार कधीही पाहिलं नाही. हे भाजप सरकार लोकांना रस्त्यावर येण्यास भाग पाडत आहे. रुग्णवाहिकेस परवानगी मिळत नाही तोपर्यंत कुडचडे नागरिक आरोग्य केंद्रासमोर साखळी उपोषणाला बसतील, असं नाईक यांनी सांगितलं.

हा व्हिडिओ पहाः Video | MAJOR PORT LAW | हा कायदा गोव्याचं अस्तित्व संपवणारा- कॉंग्रेस

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!