आईवडील रागावल्यामुळे सोडलं घर; बेपत्ता अथर्वला शोधण्यात फोंडा पोलिसांना यश

मंगळवारी सकाळची घटना; 24 तासांचा आता फोंडा पोलिसांनी शोधलं अथर्व नाईकला

शेखर नाईक | प्रतिनिधी

फोंडा: केवळ आई वडील रागावल्यामुळे मंगळवारी सकाळी घराबाहेर पडून बेपत्ता असलेल्या अथर्व मनेश नाईक (वय वर्षं १४, रा. बारभाट कवळे) या शाळकरी मुलाला संध्याकाळपर्यंत शोधून काढण्यात फोंडा पोलिसांना यश आलं. या मुलाला पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक मोहन गावडे यांनी दिली.

हेही वाचाः पोलीस खात्यातील ११ पोलीस उपनिरीक्षकांची बदली

पालकांच्या रागाने सोडलं घर

पालक रागवल्यामुळे रागाच्या भरात अथर्व सकाळी घराबाहेर पडला आणि त्याने मडगाव गाठलं. तिथून तो पणजीला जाऊन पुन्हा मडगावला आला. या दरम्यान हा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पालकांनी फोंडा पोलिसांत दिली.

शिवाय समाज माध्यमांवर त्याचा फोटो टाकण्यात आल्यानं मडगाव येथील कदंब कर्मचाऱ्यांनी पोलिसांना त्याच्या विषयी कळवलं असता फोंड्याचे उपनिरीक्षक आदित्य वेळीप यांनी मडगाव येथे जाऊन त्याला सुखरूप त्याच्या पालकांच्या स्वाधीन केलं. 

हेही वाचाः हरीष गावस यांनी घेतला वाळपई पोलिस स्थानकाच्या ‘पीआय’ पदाचा ताबा

फोंडा पोलिसांच्या कार्य तत्परतेचे कौतुक होत आहे. 

हा व्हि़डिओ पहाः Crime | Follow Up | Major Development | सिद्धी नाईकच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाची अपडेट

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!