कायद्याच्या रक्षकांनानीच ओलांडली कायद्याची रेषा

राया, सासष्टी येथे पोलीस उपनिरीक्षकाकडून युवकावर दादागिरी; कोणत्याही लेखी कागदपत्राविना अटक करण्याचा प्रयत्न

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राया, सासष्टी येथे पोलीस उपनिरीक्षकाने युवकासोबत दादागिरी करून त्याला कोणत्याही लेखी कागदपत्राविना अटक करण्याचा प्रयत्न केला. वनखात्याच्या जागेचे मुखत्यारपत्र त्या युवकाकडे आहे. त्यामुळे त्या जागेतून एका प्रकल्पासाठी रस्त्याचे रुंदीकरणाचे काम कोणताही परवाना न घेता चालू केल्याने त्या युवकाने पोलीस स्थानकात तक्रार केली होती.

पोलिसांकडून दादागिरी

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन त्या युवकासोबतच दादागिरी केली आणि त्याला सांगितले की पोलीस त्याच्या तक्रारीवर आलेले नाहीत, तर आणखी कुणाच्यातरी तक्रारीवर आलेत. युवकांनी याचे चित्रीकरण करायला सुरू केले. त्यामुळे पोलीस चिडले आणि त्याला धक्काबुक्की करून अंगावरचे कपडे देखील फाडले.

मायणा, कुडतरी पोलीस स्थानकात तक्रार

या सर्व प्रकरणाची लेखी तक्रार युवकाच्या आईने मायणा, कुडतरी पोलीस स्थानकात केली आहे आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार देण्यासाठी रात्रीच्या वेळी गेले होते. पण ते मिळाले नाहीत. पोलीस उपनिरीक्षकावर एफआयआर नोंद करून त्याच्यावर तातडीने कारवाई करावी आणि सरकारी कामावरून त्याला निलंबित करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी सोबत रिव्होल्युशनरी गोवन्सचे कुडचडेचे उमेदवार आदित्य देसाई होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!