संजीवनी बोकील यांच्या अध्यक्षतेखाली २८ रोजी ‘ललित लेखन उपक्रम’

गुगल मीटवर कार्यक्रमाचं आयोजन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः मनसा क्रिएशन्स आणि आम्ही विश्व लेखिका गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार २८ रोजी संध्याकाळी ५ वाजता महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, कवयित्री संजीवनीताई  बोकील यांच्या अध्यक्षतेखाली ‘ललित लेखन उपक्रम’ होणार आहे. हा कार्यक्रम गुगल मीटवर होणार असून साहित्यप्रेमींना  https://meet.google.com/bct-zsgh-rbg या लिंकवरून या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल. 

हेही वाचाः राणे पुन्हा मैदानात ; यात्रेवर प्रशासनाची करडी नजर

‘या’ लेखीकांचा सहभाग

डॉ. शिल्पा डुबळे परब, तेजश्री प्रभु गांवकर, आसावरी कुलकर्णी, सोनाली देसाई, मेघना कुरुंदवाडकर, केतकी साळकर, रजनी अरूण रायकर, शर्मिला प्रभू, अपूर्वा कर्पे, अमिता देसाई, नम्रता नाडकर्णी सालेलकर, रेखा  मिरजकर, मीरा प्रभू वेर्लेकर, दीपा मिरींगकर, सृष्टि नाईक, प्रज्ञा सालेलकर, स्मिता सालेलकर, इंदू लक्ष्मण परब, वंदन नायक, माधुरी उसगावकर, कविता बोरकर, डाॅ.आरती दिनकर, मंदा सुगिरे, स्मिता कारो, डाॅ. स्नेहा सुवास प्रभु महांबरे, गौरी कुलकर्णी, पौर्णिमा केरकर, सुनेत्रा कळंगूटकर, गुलाब वेर्णेकर, अक्षता किनळकर, सुरेखा देसाई या लेखिका या कार्यक्रमात सहभागी होऊन आपले लेख सादर करणार आहेत. ‘आम्ही विश्व लेखिका’ समूहाच्या अध्यक्ष प्रा. पद्माताई हुशिंग आणि उपाध्यक्ष प्रा.विजयाताई मारोतकर यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असेल. 

ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, कवयित्री

संजीवनी बोकील यांनी कथा, बालकथा, ललित, अशा विविध साहित्यप्रकारात विपुल प्रमाणात लेखन केलं आहे. त्यांची काळीजकुपी, एकांत रेघेवर, ओंजळीतले आभाळ , एक घूंट जिंदगी अशी विविध पुस्तके, कादंबऱ्या, बालसाहित्य आहेत. एवढंच नव्हे तर लॉकडाऊनच्या काळातहू त्यांची लेखणी थांबली नाही. त्यांनी आत्मचित्र हा साहित्य प्रकार उदयास आणला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या साहित्याचं संकेतस्थळ बनवलं आहे. चित्रकार, कलाकार, संगीतकार, गायक यांच्या समवेत त्यांनी आपल्या साहित्याचे वेगवगळे प्रयोग केले आहे. त्यांचा स्वतःचा युट्युब चॅनेल आहे. नुकत्याच प्रकाशीत झालेल्या “आत्मचित्र” या पुस्तकाच्या अल्पकाळात दोन आवृत्या निघाल्या आहेत. गोवा बोर्डाच्या बारावीच्या पाठ्यपुस्तकात त्यांची “माये गे माये” ही कविता समाविष्ट आहे. 

हेही वाचाः शोध सुरु! या २४ वर्षीय बेपत्ता तरुणाला कुठेही पाहिलंत तर कळवा

साहित्यप्रेमींनी अवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं, असं आवाहन ‘आम्ही विश्व लेखिका’ गोवा शाखेच्या अध्यक्ष कालिका बापट यांनी केलं आहे. 

हा व्हिडिओ पहाः Roar against PI Sherif Jacques| शेरीफ जॅकीसचे कारनामे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!