थिवीत ‘लाला की बस्ती’

रिव्होल्युशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांचा टोला

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः थिवीत परप्रांतीय मोठ्या प्रमाणात वास्तव करून गोंयकारांचे हक्क मिळवत आहेत. त्यांना वीज, पाणी यासारख्या सर्व सुविधा सरकारने मिळवून दिल्या आहेत. जवळपास शंभर परप्रांतीयांची घरं या भागात आहेत. ही घरं अतिक्रमण करून बांधली आहेत. 2010 साली ही घरं जमीनदोस्त करण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेश जारी केला होता. 2021 उजाडलं तरीदेखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून त्यांना अतिक्रमण करण्यास प्रोत्साहित केलं आहे. हे बांधकाम कायदेशीर नसतानादेखील सर्व सुविधा आणि घर क्रमांक ग्रामपंचायतीने त्यांना दिला आहे. हा सर्व प्रकार आमदार, मंत्री यांच्या आशीर्वादाने चालला आहे आणि हे परप्रांतीय आमदारांचे मतदार आहेत. त्यामुळे यांना कोणीही दुखवत नाही, असा आरोप रिव्होल्युशनरी गोवन्सचे (आरजी) प्रमुख मनोज परब यांनी केलाय.

जवळपास ३०० परप्रांतीयांची नावं मतदान यादीत सामील

आरजीने स्वतः जाऊन तिकडे काय चाललंय याचा अंदाज घेतला. तिथे वस्ताव करणाऱ्या जवळपास ३०० परप्रांतीयांची नावं मतदान यादीत सामील आहेत. कोणतीही चौकशी न करता बूथ स्तर अधिकाऱ्यांनी त्यांना मतदानाचा हक्क मिळवून दिला आहे. अनेक जातीची माणसं एकाच कुटुंबाची आहेत असं दाखवून मतदान पत्र बनवण्यात आली आहेत. कोणताही परवाना न घेता हे परप्रांतीय बिनधास्तपणे व्यवसाय करतात. या सर्व प्रकाराला ग्रामपंचायत आणि बूथ स्तर अधिकारी जबाबदार आहे, असं परब म्हणालेत. ही सर्व बेकायदेशीर मतदान पत्रे रद्द करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.

परप्रांतियांची वाढती अतिक्रमणं खपवून घेणार नाही

उच्च न्यायालयाचा आदेश असताना या परप्रांतीयांच्या अतिक्रमणावर कारवाई का झाली नाही? या मागचं कारण काय? त्यांना कुणाचा आशीर्वाद आहे? असे सवाल परब यांनी उपस्थित केलेत. आम्ही पंचायत क्षेत्रात जाऊन याचं कारण विचारणार, त्यांना कारवाई करण्यास भाग पाडणार आणि वाढणारी परप्रांतीयांची अतिक्रमण गोव्यात खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा परबांनी दिलाय.

हा व्हिडिओ पहाः Narendra Modi Birthday | चक्क भंगाराच्या साहित्यापासून साकारला मोदींचा पुतळा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!