अखिल गोवा फुगडी स्पर्धेत केरी सत्तरीचे ज्ञानज्योती महिला मंडळाची बाजी

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी
ब्युरो : राजीव गांधी कला मंदीर, फोंडा यांनी आयोजीत केलेल्या अखील गोवा फुगडी स्पर्धेचा निकाल जाहीर झालाय. यंदा या स्पर्धेत केरी सत्तरीच्या राजीव गांधी कला मंदीर आयोजित अखिल गोवा फुगडी स्पर्धेत केरी सत्तरीच्या ज्ञानज्योती महिला मंडळाने प्रथम येत बाजी मारली.
सत्तरीतील महिलांनी केली कमाल
या मंडळात सौ. जानकी रघुनाथ परब, सौ. सुहासिनी सत्यवान गावस, सौ.मंदा गणू गावस, सौ.हर्षदा हरिचंद्र गावस, सौ.सरिता चंद्रकांत गावस, सौ. संजीता सुधाकर गावस, सौ.श्रुतीका श्रीकांत गावस, सौ.सुमित्रा सुनिल शेटकर, सौ. राधा कृष्णा गावस, कु.निकीता गणू गावस, कु. प्रारंभी हरिचंद्र गावस, कु.नेहा चंद्रकांत गावस, कु.सोनिका सुधाकर गावास यांचा समावेश होता.
चषक आणि रोख बक्षिस
मंडळाच्या जानकी परब यांना उत्कृष्ट गायिकेचं दुसरं बक्षिस जाहीर मिळालं. विजेत्या मंडळाला फिरता चषक आणि तीस हजार रुपयांच रोख बक्षिस मिळालं आहे.