कामगार घोटाळाप्रकरणी भ्रष्टाचारविरोधी शाखेकडे तपास देण्यास तयार!
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
पणजी : कामगार घोटाळाप्रकरणी भ्रष्टाचारविरोधी शाखेकडे तपास देण्यास सरकार तयार असल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी केली. बुधवारी विधानसभेत मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.
वेर्णा औद्योगिक वसाहतीत गोवा ‘मेडिकल डिव्हाइस पार्क’ उभारणार असून या पार्कसाठी बोली लावली जाणार आहे. यात केवळ चार राज्यांना संधी मिळणार आहे.
संजीवनी साखर कारखाना सहकारी विभागातून कृषी विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. बांबोळीच्या गोमेकॉत ऑन्कोलॉजिस्टची कराराच्या आधारावर नियुक्ती करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दक्षिण गोवा कोविड रुग्णालयासाठी परिचारिका आणि अटेंडंट पोस्ट मंजूर करण्यात आल्या असून कोविड खर्चासाठी 12 कोटी मंजूर केले आहेत.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.