एल. डी. सामंत मेमोरियलचा १०० टक्के निकाल

६०० पैकी ५८५ गुण मिळवत अनन्या आपटे विद्यालयात प्रथम

साहिल नारुलकर | प्रतिनिधी

पेडणे : पर्वरी येथील प्रबोधन शैक्षणिक संस्था संचलित एल. डी सामंत मेमोरियल विद्यालयाने यंदा दहावीचा १०० टक्के निकाल प्राप्त करत आपली यशस्वी परंपरा कायम राखली. परीक्षेला एकूण १७३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ६२ विद्यार्थी विशेष श्रेणीत, ४९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व ५० विद्यार्थी द्वीतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

अनन्या विघ्नेश आपटे हिने ९७.५ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. तिला एकूण ५८५ गुण मिळाले. भक्ती चोडणकर हिने ९७ टक्के गुण मिळवून द्वीतीय क्रमांक तर अनुशी कारापुरकर हिने ९६.८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. अनन्या आपटे, आर्या बोरगावकर, भक्ती चोडणकर, प्रियव्रत पाटील यांनी संस्कृत विषयात तसेच अनन्या आपटे, अनुश्री कारापूरकर यांनी समाजशास्त्र विषयात व भक्ती चोडणकर हिने गणित या विषयात पैकीच्या पैकी गुण प्राप्त केले.

या घवघवीत यशाबद्दल प्रबोधन शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय वालावलकर, सचिव राजन भोबे व सामंत विद्यालयाचे व्यवस्थापक अवधूत पर्रीकर व सर्व सदस्यातर्फे विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष केदारेश्वर नार्वेकर व पालक शिक्षक संघाने शाळेचे मुख्याध्यापक म्हाळसाकांत देशपांडे, उपमुख्याध्यापक दिना बांदोडकर, दहावीचे वर्गशिक्षक काशिनाथ मोने, महेश च्यारी दिपा मणेरीकर, रिना प्रभुदेसाई तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!