लॉकडाऊन कालावधीत राज्यात केटीसी सेवा 50% क्षमतेसह सुरू

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजीः वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गुरुवारपासून सोमवारपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे कदंब महामंडळाने कदंब वाहतुकीसंबंधी एक निर्णय घेतलाय. लॉकडाऊन कालावधीत राज्यात केटीसी सेवा 50% क्षमतेसह सुरू राहणार असल्याचं कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटेंनी सांगितलंय.
हेही वाचाः ‘कदंब’च्या ताफ्यात तब्बल 30 इलेक्ट्रिक बसेस
आंतरराज्या बसेस ठेवणार बंद
महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांनी कोरोना नियंत्रणासाठी कडक लॉकडाऊन लावल्यामुळे या राज्यात जाणाऱ्या कदंब महामंडळाच्या सुमारे ४० आंतरराज्य बसेस बंद ठेवाव्या लागल्या आहेत. संजय घाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये बेसुमार वाढलेला कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी दोन्ही राज्यांनी कडक प्रतिबंध लावले आहेत. लॉकडाऊन सदृश्य हे निबंध असून त्यामुळे सार्वजनिक वाहतूक बंद आहे. याचा परिणाम म्हणून कदंब महामंडळाच्या या दोन्ही राज्यांमध्ये ये – जा करणाऱ्या चाळीस बसेस कदंब महामंडळाला बंद कराव्या लागल्या आहेत.
हेही वाचाः Good News | कदंबाने प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर, १ मार्चपासून भरघोस सवलत
लॉकडाऊन उठवल्यानंतर सार्वजनिक वाहतूक सुरू
कर्नाटक राज्यातील बेळगाव, सौंदत्ती, धारवाड, हुबळी, हॉस्पेट, बेंगळूरु, मंगळूरु आदी ठिकाणी कदंब महामंडळाच्या बसेस ये – जा करत होत्या. त्याचबरोबर महाराष्ट्रातील 5 कोल्हापूर, पुणे, सांगली, मुंबई या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कदंब महामंडळाच्या बसेस ये – जा करत होत्या. कोरोना संकटामुळे या दोन्ही राज्यात लॉकडाऊन लागल्यामुळे ४० बसेस बंद ठेवाव्या लागल्या आहेत. या दोन्ही राज्यांनी लॉकडाउन उठवल्यानंतर व सार्वजनिक वाहतूक सुरू झाली, तर पुन्हा कदंबच्या बसेस सुरू केल्या जातील, असं घाटे यांनी सांगितलंय.