रेल्वेनं प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर हे वाचाच…

हतबल कोकण रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोना महामारीमुळे रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालीय. त्याचा परिणाम रेल्वेच्या उत्पन्नावर झालाय. साहजिकच काही गाड्यांच्या फेर्‍या बंद करण्याचा निर्णय घेणं कोकण रेल्वे प्रशासनाला भाग पडलं.

आठ गाड्या रद्द करण्याचा निर्णय

कोकण रेल्वेनं आठ गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. पुढील निर्देशापर्यंत या गाड्या बंद राहतील. प्रवाशांनी याची दखल घ्यावी, असं आवाहन कोकण रेल्वेच्या वतीने पत्रकाद्वारे करण्यात आलंय. कोकण रेल्वे मार्गावरच्या तात्पुरत्या बंद केलेल्या गाड्या : 02414 हजरत निजामुद्दीन – मडगाव राजधानी सुपरफास्ट विकली स्पेशल, 02413 मडगाव – हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट विकली स्पेशल, 02120 करमळी – मुंबई तेजस एक्स्प्रेस, 02119 मुंबई – करमळी तेजस एक्स्प्रेस, 02620 मंगळुरू सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस डेली सुपरफास्ट एक्स्प्रेस, 02619 लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळुरू सेंट्रल डेली सुपरफास्ट एक्स्प्रेस, 07107 मडगाव जंक्शन – मंगळुरू सेंट्रल रिझर्व्हड एक्स्प्रेस आणि 07108 मंगळुरू सेंट्रल – मडगाव जंक्शन रिझर्व्हड एक्सप्रेस.

लांबचा प्रवास करू इच्छिणार्‍यांची गैरसोय

कोकण रेल्वे हा सर्वाधिक पसंती असलेला प्रवासाचा पर्याय आहे. मुंबईसह दक्षिणेकडच्या राज्यांतही कोकण रेल्वेच्या माध्यमातून सुलभपणे प्रवास करता येतो. मात्र आता कोकण रेल्वे प्रशासनानं गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानं प्रवाशांचा हिरमोड झालाय. कोरोनामुळे प्रवाशांची संख्या घटल्यानं हा निर्णय घेतला गेलाय. मात्र ज्यांना तातडीनं लांब पल्ल्याचा प्रवास करायचा आहे, अशांची या निर्णयामुळे अडचण होणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!