कोकण रेल्वे ठप्प ; सिंधुदुर्गात अडकलेल्या गाड्या परत मडगावला

अनेक गाड्या केल्या रद्द

देवयानी वरस्कर | प्रतिनिधी

सिंधुदुर्गनगरी : अतिवृष्टीमुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडले आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या स्टेशनवर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या, त्या अद्याप तेथेच आहेत. दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण व कामठे स्टेशन दरम्यान वशिष्ठी नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीवर गेल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील काही ट्रेन रद्द करण्यात आले आहेत.

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये 02619 लोकमान्य टिळक टर्मिनस ते मेंगलोर मत्स्यकन्या एक्सप्रेस, 01133 छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मेंगलोर, 06071 दादर तिरूनेलवेली साप्ताहिक रेल्वे, 01111 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस, 01112 मडगाव ते मुंबई कोकण कन्या एक्सप्रेस, 01004 सावंतवाडी ते दादर तुतारी एक्सप्रेस, 01003 दादर ते सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आले आहेत.

नेत्रावती एक्सप्रेस ही गाडी पनवेल, पुणे, लोंढामार्गे मडगावला वळविण्यात आली आहे तर हिसार कोईम्बतुर, वेरावळ तिरुअनंतपूरम गाडी पनवेल, पुणे, मिरज, हुबळी मार्गे इरोड जंक्शन अशी वळविण्यात आली आहे. हापा मडगाव ही देखील पनवेल, पुणे, लोंढामार्गे वळविण्यात आली आहे असे कोकण रेल्वेचे मुख्य प्रवक्ता एल. के.वर्मा यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान, सिंधुदुर्गातील काही गाड्या या पुन्हा मडगाव येथे पाठविण्यात येणार आहेत. या सर्व गाड्यांमधील प्रवाशांना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. वैभववाडी स्टेशनवर मांडवी एक्सप्रेस मडगांव ते सीएसटीएमला जाणारी गाडी संध्याकाळपासून स्टेशनला उभी आहे. त्यामध्ये 300 ते 350 प्रवासी आहेत. त्यांची जेवणाची व्यवस्था गाडीमधेच आहे.

त्रिवेंद्रम निजामुद्दीन गाडीमध्ये 250 पॅसेंजर आहेत. ही गाडी सकाळी 11.42 पासून उभी आहे. या दोन्ही गाड्यांमध्ये पॅन्ट्री आहे. जेवणाची व्यवस्था आहे. या दोन्ही गाड्या मडगांव येथे परत नेण्यात येत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!