कोकणी कवी अशोक शिलकर यांची आत्महत्या

खामीणी देवस्थानजवळ काजूच्या झाडाला गळफास लावला

शेखर नाईक | प्रतिनिधी

फोंडाः शिलवाडा सावई-वेरें येथील नामवंत कोकणी कवी आणि साहित्यिक अशोक रांगा शिलकर यांनी मंगळवारी खामीणी देवस्थानजवळ काजूच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अजून समजू शकलेलं नाही. 

हेही वाचाः BREAKING | बारावीची परीक्षा अखेर रद्द

निसर्गात रमणारा कवी

पणजीतील सरकारी छापखान्यात काम करणाऱ्या अशोक शिलकर यांना लहानपणापासूनच निसर्गाचं अप्रूप. शालेय जीवनापासूनच त्यांनी कोकणीतून कविता, कथा आणि एकांकिका लिहायला सुरुवात केली. 

हेही वाचाः सभापतींकडून साळ ग्रामपंचायतीत ‘सॅनिटायझर स्प्रे पंप’चं वितरण

विविध पुरस्कार प्राप्त

त्यांच्या लेखन साहित्याला विविध पुरस्कार प्राप्त झालेत. कोकणीचे कुळार (1985, प्रथम), 1988 साली कोकणी भाषा मंडळाचा तृतीय, तर 1989 साली द्वितीय पुरस्कार, देवसु स्पोर्ट्स आणि सांस्कृतिक संघाचा द्वितीय पुरस्कार, ‘रागताळीललें प्रतीक’ या एकांकिकेस सावई वेरें येथील कोकणी अस्मिताय केंद्राचा उत्कृष्ट लेखनाचा प्रथम पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. 

हेही वाचाः तब्बल 1 कोटी नोकऱ्या गेल्या…97 टक्के कुटुंबांचं उत्पन्न घटलं !

विविध काव्य संग्रह प्रकाशित

त्यांच्या अनेक कथा, कविता, एकांकिका आकाशवाणी तसंच दूरदर्शनवरून प्रसारित झाल्या आहेत. शिवाय पणजी दूरदर्शनवरून ते सातत्याने कविता वाचन, गीत सादरीकरण करायचे. ‘सैमाच्या आंगणात’ हा त्यांचा पहिला काव्य संग्रह. त्यानंतर ‘सैम तळ्यातले’ ‘साळीक’ आणि हल्लीच ‘वसाड’ हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. 

हेही वाचाः आशियाई बॉक्सिंग स्पर्धा; संजीतचा गोल्डन पंच!

मंगळवारी सकाळी केली आत्महत्या

मंगळवारी सकाळी 6 वाजेपर्यंत ते घरीच झोपले होते. त्यानंतर 9 वाजण्याच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलं. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे अशोक शिलकर यांच्या आत्महत्येमुळे गावात शोककळा पसरली आहे. संध्याकाळी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचाः ‘या’ जगप्रसिद्ध टेनिसपटूला 11 लाखांचा दंड

त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, दोन पुत्र आणि एक कन्या असा परिवार आहे. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!