किशोर नाईक गावकर यांना पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार प्रदान…

'विशेष कामगिरी’ पुरस्कार दै. हेराल्डचे पत्रकार भास्कर देसाई यांना

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : प्रश्न उपस्थित करणं हे, पत्रकाराचं काम, मात्र आजच्या घडीला प्रश्न विचारणं हेच कठीण बनलंय, असं प्रतिपादन गोवन वार्ता लाईव्हचे संपादक किशोर नाईक गावकर यांनी केलं. मडगावच्या रवींद्र भवनात विश्व संवाद केंद्र, गोवातर्फे देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे आदी उपस्थित होते.
हेही वाचाःदोन दुचाकींमध्ये अपघात ; एकाचा जागीच मृत्यू…

विश्व संवाद केंद्र पत्रकारिता क्षेत्रात काम करणारी संस्था

‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार २०२२ – जीवनगौरव पुरस्कार’ गोवन वार्ता लाईव्हचे संपादक किशोर नाईक गांवकर यांना देण्यात आला. तर ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार २०२२ – विशेष कामगिरी’ पुरस्कार दै. हेराल्डचे पत्रकार भास्कर देसाई यांना देण्यात आला. समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विश्व संवाद केंद्र ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवार संघटनेतील पत्रकारिता क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. या संस्थेमार्फत दरवर्षी देवर्षी नारद जयंतीचे औचित्य साधून ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ दिला जातो.
हेही वाचाःविजेचा शॉक लागून अडीच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!