‘गोवन वार्ता लाईव्ह’च्या किशोर नाईक गावकरांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर…

दैनिक हेराल्डचे दक्षिण गोवा प्रमुख भास्कर देसाई यांनाही पुरस्कार जाहीर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : ‘गोवन वार्ता लाईव्ह’चे संपादक किशोर नाईक गावकर (Kishor Naik Gaonkar) यांना विश्व संवाद केंद्राचा वर्ष 2022 साठीचा देवर्षी नारद पुरस्कार – जीवनगौरव पुरस्कार (Devarshi Narad  Award) जाहीर झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित विश्व संवाद केंद्र दरवर्षी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना पुरस्काराने सन्मानित करते. याशिवाय दैनिक हेराल्डचे दक्षिण गोवा प्रमुख भास्कर देसाई (Bhaskar Desai) यांनाही विशेष कामगिरीसाठी हा पुरस्कार जाहीर झालाय.
हेही वाचाःबनावट नोटा छापण्यात कुटुंबीयांची ‘साथ’…वाचा सविस्तर

२३ मे रोजी पुरस्काराचे वितरण

या पुरस्काराचे वितरण सोमवार २३ मे रोजी संध्याकाळी ६.३० वाजता मडगावातील रवींद्र भवन (ब्लॅक बॉक्स) येथे करण्यात येणार आहे. दरवर्षी देवर्षी नारद जयंतीचे औचित्य साधून ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ दिला जातो, अशी माहिती विश्व संवाद केंद्र पणजीचे संयोजक श्रीहरी आठल्ये यांनी दिलीए.
हेही वाचाःबारावीचा निकाल जाहीर ; मुलींनी मारली बाजी…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!