नववीत शिकणाऱ्या गोव्यातील ‘या’ तीन मुलांनी केली कमाल

‘टॉयकथॉन२०२१’ स्पर्धेत पटकावला पहिला नंबर

दयानंद राणे | प्रतिनिधी

ब्युरो : गोव्याच्या सुपुत्रांनी अभिमानास्पद अशी कामगिरी केली आहे. ‘टॉयकथॉन२०२१’ या स्पर्धेत गोव्याच्या मुलांनी अव्वल कामगिरी करत पहिला नंबर काढलाय.

गोव्यातील मुलांची जबरदस्त कामगिरी

भारत सरकारच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या ‘टॉयकथॉन२०२१’ मध्ये गोवा नेव्हल चिल्ड्रन स्कूलच्या कृष्णांग जोशी, मयंक यादव आणि तनिष्क भटनागर यांनी गोव्याला अभिमान वाटणारी कामगिरी केली. नेव्हल चिल्ड्रन स्कूलच्या नववी इयत्तेत कणाऱ्ा या विद्यार्थ्यानी डिजिटलगटामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. यापूर्वीही या डेटा हॅकाथॉनमध्ये पहिला क्रमांक तर २०२० मध्ये समस्यांचे निराकरण स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविला होता.

हेही वाचा : सोनं खरेदीसाठी गेल्या अडीच महिन्यात प्रथमच ‘सोन्याचे दिवस’

मोदींकडून कौतुकाची थाप

टॉयकाथन २०२१मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांकडे थेट संवाद साधून कौतुक केले. टॉयकाथन २०२१ साठी देशभरातून सुमारे १.२ लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांच्याकडून १७ हजार कल्पना सादर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी सुमारे ५० लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती. देशात खेळणी बाजाराला उत्तेजन देण्यासाठी तसेच भारतीय खेळण्यांची जागतिक बाजारामध्ये टक्केवारी वाढविण्यासाठी या स्पर्धेचा नक्कीच लाभ होणार आहे.

हेही वाचा : गोव्यासह 5 राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपची दिल्लीत मोर्चेबांधणी सुरू !

पाहा खास व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!