माणुसकी जिवंत आहे! डॉ. भाटीकरांची रुग्णवाहिक कोविड रुग्णांच्या सेवेत

डॉ. केतन भाटीकरांनी फोंडावासीयांसाठी उपलब्ध केली स्वतःची रुग्णवाहिका

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः मगोप नेते डॉ. केतन भाटीकरानी राजकीय मतभेद बाजूला ठेवून माणूसकीच्या दिशेने पाऊल उचललंय. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसंच काळाची गरज ओळखून डॉ. भाटीकरांनी आपली रुग्णवाहिका स्थानिक फोंडावासीयांसाठी आशीर्वादाच्या रुपात उपलब्ध करून दिली आहे. गत वर्षीपासून त्यांनी आपली रुग्णवाहिका फोंड्यातील आयडी हॉस्पिटलसाठी उपलब्ध करून दिली होती.

एकत्रित येऊन कोरोनाविरुद्ध लढण्याची वेळ

आयडी हॉस्पिटलवर असलेला अतिरिक्त भार कमी करण्यासाठी डॉ. भाटीकरांनी पुढाकार घेऊन हे पाऊल उचललं आहे. सध्या आम्ही कठीण परिस्थितीतून जात आहोत. हीच वेळ आहे जेव्हा आपण आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत आणि एकत्रितपणे काम केलं पाहिजे. निकड प्रसंगी वैद्यकीय सुविधांचा अभाव नसावा, याच कारणास्तव मी हा पुढाकार घेतला असल्याचं डॉ. भाटीकर म्हणाले. रुग्णांना मदत पुरवणाऱ्या रुग्णवाहिकेवर त्यांनी आपल्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांना नेमलं आहे. रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचण्यास मदत करण्याबरोबरच रुग्णवाहिका कोविड-19 औषधांची घरपोच डिलिव्हरीदेखील देते.

हेही वाचाः खंवटेंकडून पर्वरी आरोग्य केंद्राला ‘कोव्हिड असिस्ट’

पुढे या; सढळ हाताने मदत करा

राज्यात कोरोनाचं प्रस्थ वाढतंय. सगळे उपाय करूनही वाढती कोरोनाची साखळी तोडणं कठीण होऊन बसलंय. कोरोना बाधितांची वाढती संख्या, यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण आलाय. डॉक्टर्स, नर्सेस दिवस-रात्र काम करत आहेत. राजकीय पक्ष राजकीय मतभेद बाजूला सारून या महामारीविरुद्ध लढण्यासाठी पुढे आले आहेत. कोरोनाला जर हरवायचं असेल तर सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. अशा या कठीण परिस्थितीत पुढे या आणि सढळ हाताने मदत करा, असं आवाहन डॉ. भाटीकरांनी केलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!