‘सोशियाद’ची जमीन पुढील सुनावणीपर्यंत ‘जैसे थे’ ठेवा

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचा आदेश; पुढील सुनावणी २४ ऑगस्ट रोजी

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी: सांगे येथील उगे, पाटें आणि कोष्टी येथील सोशियाद प्राट्योटिका डॉस बालडियोस दास नोव्हास कॉन्क्विस्टास SOCIEDADE PATRIOTICA  DOS BALDIOS DAS  NOVAS CONQUISTAS, या सोसायटीची जमीन पुढील सुनावणी पर्यंत यथास्थित ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी २४ रोजी होणार आहे. याबाबत न्या. सुनिल देशमूख आणि न्या. महेश सोनक या द्वसदस्यी खंडपीठाने आदेश जारी केला आहे.

हेही वाचाः सर्किट हाऊस सुविधा निविदा पुन्हा जारी करा!

सोशियाद प्राट्योटिका डॉस बालडियोस दास नोव्हास कॉन्क्विस्टास या सोसायटीने खंडपीठात याचिका दाखल केली

या प्रकरणी उगे – सांगे येथील सोशियाद प्राट्योटिका डॉस बालडियोस दास नोव्हास कॉन्क्विस्टास या सोसायटीने खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी याचिकादाराने राज्य सरकार, महसूल सचिव, अव्वल सचिव महसूल, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, भुनोंदणी संचालनालय, अतिरिक्त दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि  सांगे मामलेदार यांना प्रतिवादी केले आहे.

राज्य सरकारने बेकायदेशीर कृत्या सोसायटीची सांगे येथील उगे, पाटें आणि कोष्टी परिसरातील ३६० हेक्टर जमीनी आपल्या नावावर केल्याचा मुद्दा याचिकेत मांडला आहे.

हेही वाचाः लार्वे बीच क्लबला २३ पूर्वी बाजू मांडण्याचा आदेश

२८ जुलै १९६६ रोजी आदेश जारी करून सबंधित जमीन सोसायटीच्या नावावर करण्यात आली

सरकारने २८ जुलै १९६६ रोजी आदेश जारी करून सबंधित जमीन सोसायटीच्या नावावर करण्यात आली होती. ही जमीन राज्य सरकारने सोसायटीला कोणतीच माहिती न देता १ एप्रिल २०२१ रोजी महसूल खात्याने दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांना पत्र लिहून संबंधित सरकारने आपल्याकडे घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर ३ जून २०२१ रोजी सबंधित जमीन उपजिल्हाधिकारी आणि सांगे मामलेदाराने आदेश जारी करून सोसायटीचे नाव हटवले आणि सरकारचे नाव घातल्याचा दावा सोसायटीने केला आहे. याबाबत खंडपीठात सुनावणी झाली असता, खंडपीठाने वरील आदेश जारी करून पुढील सुनावणी २४ ऑगस्ट रोजी ठेवली आहे.    

हा व्हिडिओ पहाः VIDEO | WORLD PHOTOGRAPHY DAY SPECIAL | ज्येष्ठ प्रेस फोटोग्राफर सुनील नाईक यांच्याशी संवाद !

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!