कवळेकर यांनी स्वतःच ती चित्रफीत पसरवली नाही कशावरून?

आम आदमी पक्षाकडून सखोल चौकशीची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : मोबाईलवरून एका व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर प्रसारित झालेली लहान मुलांची अश्लील चित्रफित उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Babu Kavlekar) यांनी स्वत:च पसरवली नाही कशावरून, असा सवाल आम आदमी पक्षानं केलाय. राज्य महिला आयोग आणि भाजपचा महिला मोर्चा विभाग या प्रकरणावर गप्प का, असा प्रश्न आपच्या नेत्या अ‍ॅड. मेलिसा सिमॉईश आणि उमा वळवाईकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

हे तर सायबर क्राईम विभागाच्या पोलिसांचं अपयश

अ‍ॅड. सिमोइश म्हणाल्या, अश्लील चित्रफितीच्या प्रकाराचा तपास लावणं पोलिसांना अजूनही जमलेलं नाही. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्याकडून एका व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर अश्लील चित्रफीत पसरवण्याच्या घटनेला एक आठवड्याहून जास्त काल लोटला आहे. त्यावर कवळेकर यांनी पोलिसांत तक्रारही केली होती. मग ही खोटी तक्रार होती काय? जर ती खोटी नव्हती, तर गुन्हेगाराला पकडण्यात आलेलं अपयश सायबर गुन्हे विभागाचा नाकर्तेपणा म्हणायचं का? एरवी सायबर गुन्हे विभाग अशा गुन्ह्यांचा छडा 2-3 दिवसांच्या आत लावतो. मग या प्रकरणात एवढी दिरंगाई कशासाठी? तेही तक्रारदार उपमुख्यमंत्री असताना? उपमुख्यमंत्री हे स्वतः सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य माणसं राज्यात सुरक्षित राहतील याची खात्री कोण देऊ शकतो?

ते उपमुख्यमंत्री आहेत, म्हणून..?

उमा वळवईकर म्हणाल्या, राज्य महिला आयोग आणि भाजपची शाखा असलेला महिला मोर्चा या अशा संस्था आहेत ज्या नेहमी महिलांशी संबंधित समस्यांविषयी आवाज उठवतात. त्यांनीही या विषयावर तोंड बंद ठेवलं आहे. एक आमदार आणि त्यांच्या पक्षाशी संबंधित असलेली व्यक्ती राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदावर असल्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक या विषयावर गप्प राहणं पसंत केलंय का?

तक्रारीविषयीच शंका…

अ‍ॅड. सिमॉईश म्हणाल्या की उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी जी तक्रार दाखल केली आहे, त्या विषयी आम आदमी पक्षाला शंका आहे. ही तक्रार खोटी असून कवळेकर यांनीच ही क्लिप स्वतः व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठविलेली असू शकते, असे त्या म्हणाल्या. या विषयामध्ये सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आम आदमी पक्ष करत आहे.

पाहा, आपच्या नेत्या काय म्हणाल्या…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!