गोवा फॉरवर्डची घरातून सुरुवात!

कविता किरण कांदोळकरांना थिवी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसाः 2022 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी गोवा फॉरवर्डने घरातून सुरुवात केली आहे. थिवी मतदारसंघातून कविता किरण कांदोळकर यांची विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांनी शुक्रवारी याविषयीची घोषणा केली आहे.

हेही वाचाः खासगी रुग्णालयांवरील अनावश्यक टीका ही निंदनीय

सर्वानुमते निर्णय

याविषयी सविस्तर बोलताना किरण कांदोळकर म्हणाले, गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई तसंच कोअर टीमळी आमची नुकतीच चर्चा झालीये. थिवीचे सरपंच, पंच सदस्य, मतदारसंघातील कार्यकर्ते यांच्यासोबतही आमची बैठक पार पाडली. हळदोणच्या लोकांचा आग्रह आहे की मी हळदोणमधून विधानसभा निवडणुक लढवावी. त्यामुळे राजकीय परिस्थिती पाहून, सगळ्यांची मतं लक्षात घेऊन तसंच पार्टीची ताकद, उमेदवार, आमदार वाढवण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत थिवी मतदारसंघातून कोलवाळ झेडपी कविता कांदोळकर यांना गोवा फॉरवर्ड संघाची उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणायचं असं ठरलंय.

हेही वाचाः देवा तुझा माझा, का रे वैराकार ; याही वर्षी पायी आषाढी वारी नाही !

थिवी मतदारसंघातून आजपर्यंत महिला निवडून आलेली नाही

थिवी मतदारसंघातून आजपर्यंत महिला निवडणून आलेली नाही. तो यंदा आमचे कार्यकर्ते ते शक्य करून दाखवली, असा मला विश्वास आहे. यंदा थिवी मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त आहेत. त्यामुळे सर्व महिला कविता कांदोळकरांना साथ देतील असा आम्हाला विश्वास आहे. त्याचबरोबर आमचे पुरुष कार्यकर्ते, समर्थक तसंच युवा आमच्या पक्षासोबत आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या भ्रष्ट सरकारला जर घरी पाठवायचं असेल, तर लोकांनी थोडी मेहनत घ्यावी लागेल आणि हे कविता कांदोळकर करून दाखवतील, असं किरण कांदोळक म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!