‘आप’कडून कवळे पंचायतीला ऑक्सिमीटर

अ‍ॅड. सुरेल तिळवे  : ‘गोवन्स अगेन्स्ट करोना’ हा गोवेकरांचा गोवेकरांसाठी राबविलेला उपक्रम

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी

पणजी : आम आदमी पक्षाच्या फोंडा शाखेतर्फे कवळे पंचायतीला 10 ऑक्सिमीटर देण्यात आले आहेत. कवळे पंचायत क्षेत्रामध्ये ऑक्सिजन तपासणी मोहीम ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी नुकतीच राबविली.

‘आप’चे नेते अ‍ॅड. सुरेल तिळवे (Surel Tilve) यांनी सांगितले की, ‘गोवन्स अगेन्स्ट करोना’ हा गोवेकरांचा गोवेकरांसाठी राबविलेला उपक्रम आहे. गोवेकरांना आधार व पाठिंबा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. कवळे भागामध्ये करोना रुग्णांची वाढती संख्या बघता त्यांना ऑक्सिमीटरची तातडीने गरज होती, असेही त्यांनी नमूद केले.

आम्ही सरकारला या गोष्टीचीही आठवण करून देऊ इच्छितो की सरकारने गोवेकर जनतेला ऑक्सिमीटर देण्याचे वचन दिलेले आहे, ज्याची पूर्तता अजून व्हायची आहे. ज्या वेगाने कोविडची प्रकरणे गोव्यात वाढत आहेत, ते पाहता सरकारने फार उशीर होण्यापूर्वी तातडीने उपाययोजना करायला हवी, असेही तिळवे म्हणाले.

या कार्यक्रमामध्ये सुरेल तिळवे यांनी सरपंच राजेश कवळेकर यांना ऑक्सिमीटर यंत्रे प्रदान केली. यावेळी ‘आप’चे सदस्य ब्रह्मानंद नाईक आणि भानुदास नाईक उपस्थित होते.

सरपंच कवळेकर म्हणाले की, ‘आप’ने आपल्या विनंतीला प्रतिसाद देऊन गोवेकरांना या कठीण काळात मदत करण्याप्रति आपली कटिबद्धता दाखवून दिली आहे. या ऑक्सिमीटर यंत्रामुळे करोना विषाणूच्या विरोधातील लढ्यात खूप मोठी मदत होणार आहे. अशा प्रकारच्या उपकरणांची उणीव जाणवत होती, असेही ते पुढे म्हणाले.

कवळे येथील रहिवाशांची सेवा करण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल मी सरपंच राजेश कवळेकर यांचा नेहमीच आभारी राहीन.
– अ‍ॅड. सुरेल तिळवे, नेते, आम आदमी पक्ष

मी दुसर्‍या राजकीय पक्षाशी निगडित असलो तरीही, सध्या पक्षीय राजकारणच्या वर येऊन एकत्र येऊन हात मिळवून कोरोनाविरुद्धचा लढा सशक्त करणे गरजेचे आहे.
– राजेश कवळेकर, सरपंच

ऑक्सिमित्रांना वाढता पाठिंबा
ऑक्सिमित्रांच्या एका टीमने स्थानिक लोकांच्या चाचणीसाठी घराघरांत जाऊन भेट दिली व करोना चाचणी केली. या चाचण्यांवेळी बघायला मिळालेली चांगली गोष्ट म्हणजे लोकांनी आपले आशीर्वाद दिले आणि उपक्रमाला पाठिंबा दर्शवला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.