कप्पू शर्माच्या मानधनात पुन्हा घसघशीत वाढ !

‘द कपिल शर्मा शो’चा नवा सिझन 21 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : टीव्हीच्या स्क्रीनवर हंगामा करणारा कॉमेडी स्टार म्हणून अवघ्या जगभरात आता कपिल शर्मा हे नाव ओळखलं जातं. आपल्या अफलातून आणि सहज विनोदी शैलीमुळे अनेकांच्या मनात घर केलेल्या कपिलमुळे त्याचा द कपिल शर्मा शो चर्चेत असतो. या कार्यक्रमामध्ये कपिल शर्मा आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांचे विनोद चाहत्यांच्या चांगलेच पसंतीत उतरत असतात. या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी कपिल तगडं मानधन घेत असून आता त्याने पुन्हा मानधनामध्ये वाढ केल्याचे म्हटले जात आहे.

लॉकडाउनच्या काळात ‘द कपिल शर्मा शो’चे चित्रीकरण बंद होते. आता हा शो थोड्या वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे. द कपिल शर्मा शोच्या नव्या सिझनसाठी पूर्ण टीमची मिटिंग देखील झाल्याचे म्हटले जाते. तसेच या नव्या सिझनसाठी कपिलने त्याच्या मानधानच देखील वाढ केली आहे.

‘बॉलिवूड लाइफ’ने दिलेल्या वृत्तानुसार पहिले कपिल शर्मा एका एपिसोडसाठी ३० लाख रुपये मानधन घेत असे. पण आता त्याने मानधनात वाढ केली असून तो एका एपिसोडसाठी ५० लाख रुपये घेणार आहे.

‘द कपिल शर्मा शो’चा नवा सिझन आठवड्यातून दोन वेळा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच २१ जुलै पासून हा शो पुन्हा वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सध्या शोचे चित्रीकरण सुरु आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!