मोठी बातमी! बलात्काराचा आरोप होता शिक्षाही झाली आणि आता निर्दोष सुटका

काय आहे संपूर्ण प्रकरण? वाचा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : 2011 साली प्रचंड गाजलेल्या विद्यार्थिनीच्या लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपीला निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने हा निर्णय दिलाय. या निर्णयाची संपूर्ण राज्यात चर्चा रंगली आहे. कन्हैया नाईक असं निर्दोष मुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

रायबंदर इथं अल्पवयीन विद्यार्थिनीला शिकवण्या देण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्या मुलीने नंतर आत्महत्या केली होती. नाईक याला बालन्यायालयाने 2017 मध्ये दोषी जाहीर केले होते. आणि चार वर्षांनंतर त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

घटना आहे २९ डिसेंबर २०११ची. रायबरंमधील कन्हैया नाईक हे चित्रकलेचे शिक्षक. एका १४ वर्षांच्या विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. ही विद्यार्थिनी शिक्षणासाठी नाईक यांच्या घरी गेली होती. दोन दिवसांनंतर या विद्यार्थिनीच्या आईला तिच्या मानेखाली संशयास्पद निशाण दिसून आले होते.

याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर ४५ वर्षांच्या कन्हैया नाईकला पोलिसांनी अटक केली. जानेवारी २०१२मध्ये नाईक यांना अटक करण्यात आली. बलात्कार, लैंगिक झळ यांसह अन्यही काही आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. यानंतर जामीनावरही कन्हैया नाईक यांची सुटका झाली होती.

नाईकांना जामीन मिळाल्यानंतर याप्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं. कारण पीडित मुलीनं स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये मुलीनं जामीनावर सुटलेल्या कन्हैया नाईकची भीती वाटत असून आयुष्य संपवत असल्याचं म्हटलं होतं. यानंतर नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पुन्हा अटक करण्यात आली. त्यांना कालांतरानं याप्रकरणीही जामीन मिळाला होता. या सर्व प्रकरणांनंतर कन्हैया नाईक यांना नोकरीवरुनही काढून टाकण्यात आलं होतं.

हेही वाचा – घरगुती वाद सार्वजनिक करणाऱ्या धक्कादायक Videoनं गुंता वाढवला

शिक्षा काय सुनावण्यात आली होती?

तब्बल सहा वर्ष चाललेल्या तपासानंतर आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर पणजीतील प्रोग्रेस हायस्कूलमधील कन्हैय्या नाईक या चित्रकला शिक्षकाला शिक्षा सुनावण्यात आली. विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्याप्रकरणी चिल्ड्रन कोर्टानं शिक्षकाला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा या शिक्षकाला सुनावण्यात आलेली.

दरम्यान, याप्रकरणाचा खटला सुरु असताना कन्हैय्या नाईकला जामीनही चिल्ड्रन कोर्टानं दिलं होतं. इतकंच नाही, तर या शिक्षकावर लावण्यात आलेला बलात्काराचा आरोपही मागे घेण्यात आला होता. तर इतर आरोपांवर खटला सुरु ठेवण्यात आला होता. कलम ३५४खाली कन्हैयाला चार वर्षांची शिक्षा लैंगिक शोषणाच्या आरोपखाली सुनावण्यात आली. तर इतर आरोपांखाली तीन वर्षांची सिक्षा गोवा चिल्ड्रन ऍक्टखाली सुनावण्यात आली होती. तसंच कोर्टानं दीड लाख रुपयांचा दंडही कन्हैया नाईक यांना सुनावला होता. दरम्यान, आता त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

हेही वाचा –

विलास मेथर हत्याप्रकरणाचा छडा लावल्यानं पर्वरी पोलिसांना डिजीपींनी दिली शाबासकी

वादग्रस्त फेसबूक लाईव्हच्या 10 दिवसांनंतर तिची आत्महत्या

सूनेनंच रचला सासूच्या हत्येचा प्लान?

16 ऑगस्ट 2017ची बातमी – पाहा व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!