शिरोड्याच्या कामाक्षी देवीचं मंदिर उघडणार, पण…

Goan Varta Live | प्रतिनिधी
फोंडा : शिरोड्याच्या कामाक्षी देवीच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविकांना मंदिर व्यवस्थानपनानं दिलासा दिलाय. येत्या 16 नोव्हेंबरपासून भाविकांना देवीचं दर्शन घेता येणार आहे. मात्र मंदिर व्यवस्थापनानं त्यासाठी अनेक अटीही घातल्या आहेत.
लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणजे शिरोड्याची श्री कामाक्षी देवी. दर अमावास्येला मंदिराच्या आवारात भक्तांची गर्दी उसळते. मात्र करोनानं थैमान घातलं आणि इतर मंदिरांप्रमाणे कामाक्षी देवीचंं मंदिरही भक्तांसाठी बंदच राहिलं. मात्र लॉकडाउन उठवल्यानंतर मंदिर व्यवस्थापनानं देवस्थान भाविकांसाठी पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला. मात्र देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी ज्या दिवशी होते त्या अमावास्येदिवशी दर्शन बंद ठेवण्यात आलय.
सरकारनं घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करून फक्त दर्शनासाठी मंदिर खुलं ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मंदिर व्यवस्थापन समितीनं नियमावली तयार केलीय.
मंदिर व्यवस्थापन समितीची नियमावली…
- 1. दर्शनाची वेळ : सकाळी 8 ते 11, दुपारी 3 ते संध्याकाळी 6
2. रजिस्टरमध्ये करावी लागणार नावनोंदणी
3. मास्क, सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक
4. प्रवेशद्वारावर थर्मल गनद्वारे तपासणी
5. मंदिर व्यवस्थापनातर्फे सॅनिटायझरची व्यवस्था
6. फुलं, फळं आणि अन्य सामग्रीला बंदी
7. गार्हाणी, तीर्थप्रसाद, पालखी उत्सव नाही
8. प्रदक्षिणेस बंदी, मंदिरात बसण्यास प्रतिबंध
9. नित्य देवकार्याव्यतिरिक्त धार्मिक कार्यक्रम स्थगित
10. इतर सणांच्या दिवशी देवीचं दर्शन बंद
11. देवीचा कौल घेतल्यानंतर नियमांत बदल शक्य