सोमनाथ कोमरपंत यांना कालिदास पुरस्कार जाहीर

11 जुलै रोजी पुरस्काराचं वितरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः येथील कोकण मराठी परिषदेतर्फे दिला जाणारा चौदावा ‘कवीकुलगुरू कालिदास पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि समीक्षक सोमनाथ कोमरपंत यांना जाहीर झाला आहे.
कोकण मराठी परिषदेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष एड. रमाकांत खलप आणि कोमप अध्यक्ष सागर जावडेकर यांनी या पुरस्काराची आज घोषणा केली. रोख रक्कम, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

हेही वाचाः रिलायन्स जिओ देशात प्रथम 5 जी लाँच करणार

11 जुलै रोजी पुरस्काराचं वितरण

कोकण मराठी परिषद गोवातर्फे दरवर्षी आषाढाच्या पहिल्या दिवशी (आषाढस्य प्रथम दिवसे) आयोजित कालिदास महोत्सवात गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिकाला हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा या पुरस्काराचे वितरण ११ जुलै रोजी होणार आहे. आजपर्यंत हा पुरस्कार विष्णू वाघ, गजानन रायकर, विनायक खेडेकर, पु. शि. नार्वेकर, सुदेश लोटलीकर, गोपाळराव मयेकर, अशोक नाईक, गुरूनाथ नाईक, श्रीराम कामत, एस. एस. नाडकर्णी, सुरेश वाळवे, लक्ष्मण पित्रे यांना मिळाला आहे.

हेही वाचाः भारत जगातील सौर ऊर्जेचे हब बनणार

गुरुवारी झाली बैठक

आज झालेल्या कोमप बैठकीला सचिव चित्रा क्षीरसागर, खजिनदार अजित नार्वेकर, कार्याध्यक्ष नारायण महाले, सदस्य प्रकाश क्षीरसागर तसंच मंगेश काळे उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!