पुढील वर्षापासून कलावृद्धी पुरस्कार : मंत्री गावडे

कला व संस्कृती खात्यातर्फे कला गौरव पुरस्काराचे वितरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पुरस्कार हा कलाकारांना प्रोत्साहन देणारा असतो. यातूनच नवनवीन कलाकार घडत असतात. त्यासाठी येणाऱ्या आर्थिक वर्षापासून ४० ते ५९ वयोगटांतील कलाकारांसाठी कला व संस्कृती खात्यातर्फे ‘कलावृद्धी पुरस्कार’ देण्यात येणार असल्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी जाहीर केले.

कला व संस्कृती खात्यातर्फे संस्कृती भवनात आयोजित केलेल्या कला गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कला व संस्कृती सचिव मिनिनो डिसोझा, संचालक सगुण वेळीप, व उपसंचालक अशोक परब उपस्थित होते.

हेही वाचाः कचरा प्रकल्प, भंगार अड्ड्यांकडून सरकारची सत्वपरीक्षा

कलेला जात, धर्म किंवा इतर कुठल्याच गोष्टीचे बंधन नसतेे. आमच्या जेष्ठांनी संस्कृती जन्माला घातली आणि त्यातून कलेचे निर्मिती झाली. आम्ही आज त्या कलेचा आस्वाद घेत आहोत. यासाठी आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहणार आहोत, असे मंत्री गावडे यांनी यावेळी सांगितले.

गोव्याची कला सातासमुद्रापार

गोवा राज्य विविधतेने नटलेले आहे. आज गोव्याबाहेरील लाेकही गाेव्याच्या संस्कृती विषयी बोलत आहे त्याचा आम्हाला अभिमान वाटायला हवा. गोवा राज्याची संस्कृती आणि कला आज साता समुद्रा पलिकडे पोहचली आहे. याचे सर्व श्रेय आमच्या कलाकारांना जाते. राज्यातील कलेबाबत जेवढी विविधता आहे, तेवढे इतर कुठल्या राज्यात सहसा दिसत नाही. गोवा ही देशाची सांस्कृतीक राजधानी बनली आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.

या कलाकारांचा झाला सन्मान

ज्ञानेश्वर पालयेकर, गणेश गावणेकर, शशिकला गोवेकर, आनंद नाईक, अरूण भोसले, शंकर नादोडकर, विश्वनाथ कामत, विनोद जांबावलीकर, संतोष नाईक, सुनिता चोडणकर, चंद्रकांत गावस, दामोदर शेट पारकर, प्रेमानंद परब, शांता कोलवेकर, सधू खोलकर, शाबा गावस, मंगल शिरोडकर, कस्तुरी देविदास, जाॅन आगियार, रमेश वंसकर, अॅड. राजेश नार्वेकर, शैलेशचंद्र रायकर, विश्वनाथ नाईक, पीटर परेरा, मुकुंद मणेरीकर, आनंद आमोणकर, सुकूर फर्नांडिस, फेलिसिदादे रिबेलो फर्नांडिस, मिगेल ऊर्फ मायकल आझावेदो, रोक डायस, सेबेस्तिन आफोन्सो या कलाकारांना शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व २५ हजार रुपये रोख प्रदान करून कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.                        

हेही वाचाः आता PM किसान योजनेत 8000 रुपये मिळणार! 2023 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा होणार आहे, वाचा तपशील

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!