कदंबची आजपासून पुणे, मुंबई सेवा

लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्यांनाच बसमध्ये प्रवेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: कोविडमुळे बंद असलेली कदंब महामंडळाची आंतरराज्य मार्गावरील सेवा आता हळूहळू सुरू करण्यात येत आहे. या अंतर्गत बुधवारपासून मुंबई, पुणे आणि बेंगळुरू या तीन मार्गांवरील फेऱ्या होणार आहेत.

हेही वाचाः ‘त्या’ रशियन महिलेने आत्महत्याच केल्याचं स्पष्ट

लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्यांनाच बसमध्ये प्रवेश

या बसमध्ये लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी दिली. या बसेसना प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

दोन बसेस तिन्ही मार्गांवरून धावणार

या तिन्ही मार्गांवर दररोज संध्याकाळी पणजी कदंब बसस्थानकावरून प्रत्येकी एक बस सुटेल. ती सकाळी गंतव्य स्थानावर पोहोचेल. त्यानंतर ती बस संध्याकाळी तिथून सुटून दुसऱ्या दिवशी पणजीत येतील अशाप्रकारे एकूण दोन बसेस या तिन्ही मार्गांवरून धावणार आहेत.

हा व्हि़डिओ पहाः RAPE | FATHER | स्वत:च्याच सहा वर्षीय मुलीवर अत्याचार

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!