कदंब बसचे तिकिट आता ‘क्यूआर कोड’वरून

कॅशलेस व्यवहारावर भर; वेळ वाचणार; महिन्याच्या पाससाठीही पद्धत विचाराधीन

नारायण गवस | प्रतिनिधी

पणजीः भारत सरकारचा डिजीटल इंडियाचा सर्व क्षेत्रात वापर होत असताना दिसत आहे. आता गोवा कदंब महामंडळानेही कदंबाचे तिकीट पेटीएम अ‍ॅपद्वारे खरेदी करता येणार आहे. क्यूआरद्वारे बस तिकीट खरेदी सेवा सुरु करण्यात आली आहे. नुकतंच कदंब महामंडळाने आणि पेटीएमने कॅशलेस क्यूआर बस तिकीटची सुरुवात केली आहे. जास्तीत जास्त कॅशलेसचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. तसंच वेळही वाया जाणार आणि पैशाची देवण घेवण यातून कमी होणार आहे.

हेही वाचाः उपमुख्यमंत्र्यांकडून पेडणेकरांची नोकऱ्यांच्या नावाखाली फसवणूक

आता क्यूआर कोडद्वारे काढा तिकीट

देशात सर्वत्र डिजीटल व्यावसाय सुरु झाला आहे. अनेक ठिकाणी लोक पेटीएम क्यूआर कोडचा वापर करत आहे. गोवा कदंब महामंडळाने आता याची सुरुवात केली असल्यानं याचा फायदा अनेक लोकांना होणार आहे. पूर्णपणे कंप्यूटरवर आधारित ही सेवा आहे. प्रत्येक कदंब बसमध्ये तसेच कंदबा बसस्थानकावर याचा क्यूआर कोड असणार आहे. बसमध्ये चाढण्याअगोदर प्रवाशी क्यूआर कोडद्वारे आपली तिकीट नोंदणी करु शकतात. तसंच बसमध्ये बसूनही प्रवासी वाहकाकडे असलेल्या क्यूआर कोडद्वारे तिकीट काढू शकतात. तिकीट नोंदणी केल्याचा पुरावा बस वाहकांना दाखवणं गरजेचं आहे, असं कदंब महामंडळाचे व्यावस्थापकीय संचालक एस. एल. घाटे यांनी सांगितलं.

हेही वाचाः वायफायची केबल कापल्यावरुन आमदार सोपटे, आरोलकरांमध्ये शीतयुद्ध

‘या’ गोष्टी विसरू नका

क्यूआर कोडमार्फत तिकीट काढताना काही बाबी प्रवाशांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. जर बस १२ वाजता आहे, तर प्रवाशांना एक तास अगोदर आपलं तिकीट क्यूआर कोडद्वारे बुक करावं लागेल. क्यूआर मार्फत तिकीट काढल्यावर किमान एक तासाच्या आत बसमध्ये बसणं अनिवार्य आहे. जर एका तासानंतर प्रवासी बसमध्ये बसले, तर ते तिकीट रद्द होणार आहे. काढलेलं तिकीट फक्त एक तास वैध असणार आहे, याची प्रवाशांनी नोंद घेणं आवश्यक आहे. प्रत्येक स्मार्ट फोनमध्ये क्यूआर कोड नोंद केला की तो सरळ कदंब कार्यालयाकडे जातो. क्यूआर कोड नोंद केल्यावर प्रवाशांना बसची वेळ दाखवली जाते, असं घाटे म्हणाले.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 40 हजारांवरच

महिन्याच्या पाससाठीही पद्धत विचाराधीन

कदंबमधून अनेक सरकारी तसंच खासगी काम करणारे कामगार महिन्याचा पास काढत असतात. त्यांच्यासाठी आता क्यूआर पद्धत लागू केली जाणार आहे. त्यासाठी लागणारं सॉफ्टवेअर लवकरच सुरु केलं जाणार आहे. सर्व पासही आता क्यूआरकोडद्वारे काढले जाणार आहेत. जगामध्ये ही क्यूआर पद्धत वापरली जाते. भारतात जास्त बस तिकीटसाठी क्यूआर कोड वापरला जात नाही. कदंबने प्रथमच हा प्रयोग केला आहे. सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात. नंतर ही पद्धत सुरळीत होणार आहे, असं घाटे यांनी सांगितलं.

हा व्हिडिओ पहाः Video | ILLEGAL | CONSRTUCTION | अतिक्रमण हटाव पथकाच्या साहाय्यानं हटवले गाळे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!