पत्रकार वासु चोडणकर ठरले पहिले कोविड बळी

चोडणकर बार्देश तालुक्यातील पोंबुर्फा येथील रहिवाशी ; 'तरूण भारत'चे पर्वरी प्रतिनिधी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात कोविडच्या या काळात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या पत्रकारांपैकी वासु चोडणकर हे बार्देश तालुक्यातील पोंबुर्फा येथील रहिवाशी तसेच दै. तरूण भारतचे पर्वरी प्रतिनिधी वासु चोडणकर हे राज्यातील पहिले कोविड बळी ठरले आहेत. गेली 20 वर्षे ते ग्रामिण पत्रकार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने गोवा श्रमिक पत्रकार संघटनेने दुःख व्यक्त केलंय.
सरकारने अलिकडेच पत्रकारांना फ्रंटलाईनचा दर्जा दिला आहे. लसीकरणात पत्रकारांना प्राधान्य देण्यात आल्याने अधिकतर पत्रकारांनी त्याचा लाभ घेऊन लसीकरण करून घेतलंय. या एकूणच कोविडच्या परिस्थितीत सरकारचे संदेश लोकांपर्यंत पोहचविण्यात तसेच लोकांच्या वेगवेगळ्या समस्या,अडचणी, प्रश्न सरकारी यंत्रणेपर्यंत पोहचविण्यात पत्रकारांचे मोठे योगदान ठरलेय. स्वतःची सुरक्षा धोक्यात घालून पत्रकार फिल्डवर काम करत आहेत.

शांत स्वभावाचे वासु चोडणकर
अत्यंत शांत आणि सगळ्यांचा आदर करणारे वासु चोडणकर यांच्या निधनाने माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर, पर्वरीचे आमदार रोहन खवंटे यांनी दुःख व्यक्त केलंय. पर्वरी तसेच पूर्वीच्या हळदोणा मतदारसंघाच्या सामाजिक, आर्थिक विकासात पत्रकार म्हणून त्यांचं योगदान आहे,असंही अॅड. नार्वेकर यांनी म्हटलंय. कोविडच्या या काळातही चोडणकर यांनी काम केलं होतं, असं आमदार खंवटे म्हणाले.

केंद्राकडून पत्रकारांसाठी योजना
केंद्र सरकारने कोविडमुळे निधन पावलेल्या पत्रकारांसाठी पत्रकार कल्याण योजनेला मंजूरी दिलीए. या योजनेअंतर्गत कोविडमुळे निधन पावलेल्या पत्रकारांच्या पिडित कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रूपयांची मदत मिळणार आहे. या योजनेची माहिती राज्यांनाही पाठविण्यात आली असून अशा पिडित कुटुंबांपर्यंत ही योजना पोहचविण्याचे निर्देश दिलेत. देशभरात आत्तापर्यंत 26 पत्रकारांनी कोविडमुळे आपला जीव गमावल्याची नोंद केंद्राकडे झालीए.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!