‘आरजी’च्या क्रांती चळवळीत गोंयकारांनो सहभागी व्हा

मनोज परबांचं जनतेला आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः 18 जून हा दिवस आपण क्रांती दिन म्हणून साजरा करतो. या क्रांतीची सुरुवात गोव्याला पोर्तुगिजांच्या जुलमी सत्तेपासून मुक्त करण्यासाठी झाली होती. त्यासाठी अनेकांनी रक्त सांडलं. कित्येक जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर 19 डिसेंबर 1961 या दिवशी गोवा पोर्तुगिजांच्या जुलमी जोखडातून मुक्त झाला. परंतु साठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही गोवा खऱ्या अर्थाने मुक्त झालेला नाही. गोंयकारांना जर त्यांचं अस्तित्व जपायचं असेल तर आज क्रांती करण्याची गरज आहे. ‘आरजी’च्या क्रांती चळवळीत गोंयकारांनी सहभागी व्हावं, असं फेसबुकच्या माध्यमातून गोंयकारांना संबोधित करताना रिव्होल्यूशनरी गोवन्सचे मनोज परब म्हणाले.

हेही वाचाः गोवेकरांची कळकळीची मागणी!

स्वतःच्या वोट बँकासाठी गोंयकारांचं अस्तित्व पणाला लावलं

स्वातंत्र्याच्या कालखंडात जनतेने ज्यांना राज्य चालवण्याची संधी दिली त्यांनी अक्षरशः लोकशाहीचा खून पाडला. स्वतःची, सत्तेची आणि संपत्तीची लालसा पूर्ण करण्यासाठी गोव्यातील जनतेला लाचार बनवलं. ‘सुजलाम् सुफलाम्’ अशी गोव्याची भूमी परप्रांतीय बिल्डर ठेकेदार यांना विकली. गोंयकारांचे हक्क त्यांच्यापासून हिरावून घेतले, उद्योगधंदे आणि नोकरी त्यांना बहाल केली, फक्त स्वतःच्या वोट बँकासाठी गोंयकारांचं अस्तित्व पणाला लावलं. “सबका साथ सबका विकास” या गोंडस नावाखाली शेतजमिनी, राने यांचा नाश केला, असं परब म्हणाले.

हेही वाचाः KARNATAKA UNLOCK : बेळगावसह 16 जिल्हे सोमवारपासून ‘अनलॉक’

हजारो क्रांतीकारी आता ‘आरजी’च्या चळवळीत सहभागी

गोव्याच्या जीवनदायी नदी-नाले केंद्र सरकारच्या हवाली केल्या. गोव्यातील युवकांनी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करावं लागतंय. जनतेला आपण कसत असलेल्या जमिनीची हक्क प्राप्त झाले नाहीत. गोव्यातील तरुणांना नोकरीतून डावलून परप्रांतीयाचे चोचले पुरविले जात आहेत. या स्वकीयांच्या गुलामगिरीतून जनतेला मुक्त करण्यासाठी साडेचार वर्षांपूर्वी रिव्होल्युशनरी कोणत्या क्रांतीकारी संघटनेची स्थापना झाली. सुरुवातीला ७/८ तरुणांनी स्थापना केलेल्या संघटनेचा वृक्षाचा फोफावलेला आहे. त्यांची मुळे सर्व गावात रुतलेली आहेत. हजारो क्रांतीकारी आता या चळवळीत सहभागी झालेत, अशी माहिती परबांनी दिली.

हेही वाचाः WORLD YOGA DAY | इतिहास गोवा-योगभूमीचा

मंत्री-आमदारांना सत्तेपासून खाली खेचण्यासाठी हीच वेळ

भ्रष्टाचाराला खतपाणी घालून राजकारणी आज आपले खिसे भरण्यात गुंग झालेत. तरुणवर्ग भरकटलेला आहे. अशा वेळी गोंयकारांना त्यांचे हक्क आणि गोंयकारपण देण्यासाठी ही संघटना आणि क्रांतिकारी युवक अहोरात्र झटत आहेत. खोटारडे आणि जनतेला लबडणाऱ्या मंत्री आणि आमदारांना सत्तेपासून खाली खेचण्यासाठी हीच वेळ आहे. कोरोनासारख्या महामारीच्या संकटापासून त्रस्त झालेल्या जनतेला ही संघटना सहाय्य करीत आहेत. ऊन, पाऊस आणि वारा याची तमा न बाळगता हे क्रांतिकारी तरुण सरकारी हॉस्पिटलच्या बाहेर उभे राहून रोगी आणि त्यांचे नातेवाईक यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करीत आहे. कोविड ग्रस्तांच्या घरी जाऊन विषणूनाशक फवारणी करत आहेत. संपूर्ण गोवाभर यांचं कार्य अखंडपणे चालू आहे, असं परब म्हणाले.

हेही वाचाः सरकारी नोकरीः विक्रमाच्या पाठीवरचा वेताळ

गोंयकारपण राखण्यासाठी निर्भयपणे पुढे यावं

ही संघटना प्रत्येकाच्या हृदयात ठाण मांडून बसलेली आहे आणि त्यांना मिळत असलेला पाठिंबा पाहून सरकार घाबरला आहे आणि या संघटनेला नामशेष करण्याचे प्रयत्न करत आहे. तरुणांना विनाकारण पोलीस कोठडीत डांबून ठेवण्याचा प्रकार चालू आहे तरीसुद्धा न घाबरता क्रांतिकारी तरुण आपले कार्यक्रम राबवीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल प्रत्येक गोंयकाराने घेऊन या क्रांतीत सहभागी होण्याची नितांत गरज आहे. आज ही संघटना गोंयकारांच्या अस्तित्वासाठी त्यांचे हक्क त्यांना परत मिळवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. यासाठी समस्त स्वाभिमानी गोवेकरांच्या सहकार्याचा आर्थिक मदतीची गरज आहे. 2022 च्या निवडणुकीत जर पुन्हा सत्ता भ्रष्टाचारच्या हाती गेली तर गोवा आणि गोंयकारांचा सर्वनाश अटळ आहे. या प्रामाणिक संघटनेचं काम गोवा प्रेमी जनतेच्या आर्थिक देणगीवर चाललंय. आता समस्त गोंयकारांनी या त्यांच्या कार्याला आर्थिक हातभार लावावा. आपलं शक्य असेल तेवढी मदत करून संघटना मजबूत करण्यास हातभार लावावा. आपले आशीर्वाद आणि पाठबळ असावं. कसल्याही दबावाला बळी न पडता या क्रांती संग्रामात उडी घेऊन क्रांतीकरांचं ध्येय आणि मनोबल वाढवावं. गोंयकारपण राखण्यासाठी निर्भयपणे पुढे यावं, असं आवाहन परबांनी जनतेला केलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!