Jobs in Goa : गोव्यातील अप्रशिक्षित युवकांना मिळणार रोजगार…

जुने गोवेत शुक्रवारी कार्यशाळा; नामवंत औद्योगिक अस्‍थापनांशी करणार करार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्यावतीने शुक्रवारी ४ रोजी जुने गोवे येथे ‘भविष्यासाठी कौशल्य’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विविध औद्योगिक संघटना व संस्थांचे मिळून जवळपास ९० अधिकारी या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संचालक दीपक देसाई यांनी दिली.
हेही वाचाःभारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी…

कौशल्यासाठी काय करता येईल यावर चर्चा होणार

या कार्यशाळेअंतर्गत राज्यात आवश्यक असणारी कौशल्ये, पुरवठा साखळी या विषयांवर तसेच आवश्यक असणाऱ्या कौशल्यासाठी काय करता येईल यावर चर्चा होणार आहे. दरम्यान, विभागातर्फे राज्यातील विविध भागधारकांसह सामजस्य करारावर सही केली जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शेवटच्या सत्रात सहभागी होणार आहेत. हे सत्र सर्वांसाठी खुले आहे. सध्या विभागातर्फे ४२ विविध वर्ग घेण्यात येतात. नव्यानेच इलेक्ट्रिक वाहनासाठीच्या व तांत्रिक अभ्यासासाठीच्या नवीन अभ्यासक्रमांची भर पडली आहे. राज्यातील तरुणांना जास्तीत जास्त कौशल्याधारीत करण्याच्या अनुषंगाने विविध अभ्यासक्रम बनविण्यात आल्याची माहिती देसाई यांनी दिली.
हेही वाचाःMopa Airport : मोपा विमानतळाला बांदोडकरांचे नाव द्या!

महिलांसाठी कमी कालावधीचे अभ्यासक्रम घेतले जाणार

दरम्यान, सोमवारी साखळीत नवीन कौशल्य अभ्यास केंद्राची सुरुवात सोमवारी ७ रोजी साखळी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. याठिकाणी विशेषतः महिलांसाठी कमी कालावधीचे अभ्यासक्रम घेतले जाणार आहेत. यावेळी राज्यातील सुमारे ७०० महिला उपस्थित राहणार आहेत. असे देसाई यानी सांगितले.
हेही वाचाःWhat Do You Think? : व्यक्त व्हा! तुम्हाला कांय वाटत? भाऊसाहेब की पर्रीकर ?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!