JOB VARTA | भारतीय कृषी संशोधन संस्थेत नोकरीची संधी…

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्ट : भारतीय शेती संशोधन परिषदने भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या ओल्ड गोवा येथील कार्यालयात तात्पुरत्या आधारावर नोकर भरती जाहीर केलीए. नाबार्ड प्रोजेक्टच्या “गोव्यातील शाश्वत मत्स्यसंवर्धनासाठी प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकाद्वारे उद्योजकता विकास आणि उपजीविका सुधारणा”साठी फिल्ड असिस्टंट म्हणून पदभरती केली जाणारेय. या पदासाठी १ जागा भरली जाणारेय.
हेही वाचा:Accident | चीनमध्ये बसचा भीषण अपघात ; २७ प्रवासी ठार
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडे फिशरिज सायन्समध्ये पदवी किंवा मरिन सायन्समध्ये पदवी किंवा इंडस्ट्रीअल फिश अँड फिशरिजमधील पदवी किंवा फिशरीजमध्ये डिप्लोमा किंवा अॅक्वाकल्चरमध्ये पदवी असणं आवश्यक आहे. या पदासाठी मासिक रुपये १५ हजार मानधन दिलं जाणारेय.
हेही वाचा:JOB VARTA | गोवा राज्य जैवविविधता मंडळात नोकरीची संधी…
मुलाखतीची तारीख, वेळ आणि इतर
पात्र उमेदवार निवड प्रक्रियेसाठी 29-09-2022 रोजी सकाळी 9.30 वाजता भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या ओल्ड गोवा येथील कार्यालयात त्यांच्या ओळखपत्रांसह उपस्थित राहु शकतात. पदासाठीची पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी आणि शर्ती जाणून घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या ccari.icar.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
हेही वाचा:Goa Politics | ७२ तासांत अविश्वास ठराव! मडगाव नगरपालिकेत राजकीय घडामोडींना वेग…