JOB VARTA | GOA SPORTS AUTHORITY |गोवा क्रीडा प्राधिकरणात नोकरीची संधी…

रजत सावंत | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्ट : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी गोवा क्रीडा प्राधिकरण सुवर्ण संधी घेऊन आलंय. विविध पदांकरता गोवा क्रीडा प्राधिकरणाने पदभरतीसाठी जाहीरात प्रकाशित केलीए.
हेही वाचा:JOB VARTA | महिलांसाठी स्वावलंबी होण्याची सुवर्ण संधी
कंत्राटीतत्वावर विविध पदांसाठी भरती
गोवा सरकारच्या अंतर्गत असलेल्या गोवा क्रीडा प्राधिकरण या स्वायत्त संस्थेने खेलो इंडिया राज्य एक्सलन्स केंद्र योजनेसाठी कंत्राटीतत्वावर विविध पदांसाठी निवडीद्वारे भरती करण्यासाठी थेट मुलाखतीसाठी जाहीरात प्रकाशित केली आहे. गोवा क्रीडा प्राधिकरणाने जारी केलेल्या जाहिरातीनुसार वॉर्डनसाठी एक पुरुष एक स्त्री, पुरुष इलेक्ट्रीशिअन म्हणून एक, पर्यवेक्षक म्हणून १, प्लंबर म्हणून १, एमटीएस अर्थात ग्राउंडमन या जागी ६ ज्यातील३ पुरुष आणि ३ स्त्रिया, एमटीएस अर्थात हाउसकिपिंगच्या जाग्यासाठी एकूण ४ ज्यातील दोन पुरुष आणि दोन स्त्रिया आणि सुरक्षा रक्षक म्हणून एका अशी एकूण २४ पदांची भरती केली जाणारेय.
हेही वाचा:Scam | पंजाब-महाराष्ट्र बँक घोटाळ्याचा गोमंतकीयांवर परिणाम, वाचा सविस्तर…
विविध पदांसाठीची शैक्षणिक पात्रता
गोवा क्रीडा प्राधिकरणाने जारी केलेल्या या विविध पदांसाठीची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. वॉर्डन पदासाठी उमेवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर असंण आवश्यक आहे. इलेक्ट्रिशिअन या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतलं इलेक्ट्रीशियन ट्रेडमधलं प्रमाणपत्र किंवा तत्सम प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. पर्यवेक्षक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार बारावी उत्तीर्ण असणं अपेक्षित आहे. प्लंबर पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून प्लंबर तसंच फिटर ट्रे़डमधील कोर्स प्रमाणपत्र किंवा नोंदणीकृत प्लंबर तसंच फिटर किंवा संबंधित क्षेत्रात दोन वर्षं काम केल्याचा अनुभव हवा. एमटीएस ग्राउंडमन या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असणं अपेक्षित असून हाउसकिपिंग पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने किमान आठवी पास असणं अपेक्षित आहे. सुरक्षा रक्षक पदासाठी उमेदवाराने १० उत्तीर्ण केलेली असलं पाहिजे.
हेही वाचा:Google | गूगलच्या लोगोचा रंग का बदलला? सुंदर पिचाईंनी सांगितले ‘हे’ कारण…
विविध पदांसाठीचे नियम आणि अटी
गोवा क्रीडा प्राधिकरणाने जारी केलेल्या या विविध पदांसाठीच्या नियम आणि अटींविषयी सांगायचं झाल्यास पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा १८ वर्षांवरील आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावा. उमेदवार गोव्याचा मागील १५ वर्षांपासून रहिवासी असायला हवा. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीसाठी १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत उपस्थित राहावं लागेल. दुपारी १२ नंतर आलेल्या उमेदवारांचा विचार थेट मुलाखतीसाठी केला जाणार नाही. उमेदवारांनी १६ सप्टेंबर रोजी दिलेल्या वेळी कांपाल पणजीतील इनडोअर स्टेडियम येथे असलेल्या हाय परफॉर्मन्स संचालक यांच्या कार्यालयात उपस्थित राहणं अपेक्षित आहे. उमेदवारांनी अर्ज तसंच आधार कार्ड, ३ पासपोर्ट आकाराचे फोटो, डॉक्युमेंट्सच्या वैध मूळ आणि छायाप्रती जसं की शैक्षणिक पात्रता, जन्माचं प्रमाणपत्र आणि सक्षम प्राधाकरणाने जारी केलेलं १५ वर्षांच्या निवासाचं प्रमाणपत्र सोबत आणणं अपेक्षित आहे.
हेही वाचा:Sleep Champion | कोलकाताची तरुणी १०० दिवस ९ तास झोपली अन् मिळाले ५ लाख रुपये…