Job Opportunity | गोवा मानव संसाधन विकास महामंडळात नोकरीची संधी, वाचा सविस्तर…

सुरक्षा रक्षक (बहुकुशल) महिला व पुरुष या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत

रजत सावंत | प्रतिनिधी

पणजी : गोवा मानव संसाधन विकास महामंडळ गोवा येथे सुरक्षा रक्षक (बहुकुशल) महिला व पुरुष या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सुरक्षा रक्षक पुरुष 50 व सुरक्षा रक्षक महिला 30 अशा एकूण 80 जागांसाठी ही जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
हेही वाचा:‘आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही’…

पात्र उमेदवारांना 3 महिने निवासी प्रशिक्षण

गोवा एचआरडीसी भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्यासाठीचे अर्ज गोवा मानव संसाधन विकास महामंडळ गोवा येथे 24/08/2022 ते 20/09/2022 पर्यंत सकाळी 10 ते दुपारी 1 व दुपारी 2 ते 5 पर्यंत उपलब्ध आहेत. या अर्जांसाठी 50 रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. अर्जदार 24/08/2022 ते 20/09/2022 या तारखेपर्यंत अर्ज करु शकतात. पात्र उमेदवारांना 3 महिने निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
हेही वाचा:बेळगावमध्ये बिबट्याचा ‘धुमाकूळ’, 22 शाळांना सुट्टी जाहीर…

शैक्षणिक पात्रता

सुरक्षा रक्षक (बहुकुशल) महिला व पुरुष :- आठवी इयत्ता पास

वयोमर्यादा

सुरक्षा रक्षक (बहुकुशल) महिला व पुरुष :- 18 ते 32 वर्षे

वेतन

सुरक्षा रक्षक (बहुकुशल) महिला व पुरुष :- 16 हजार रुपये महिना (इपीएफ आणि ईएसआय सहीत)

शारीरिक पात्रता

वजन :- वैद्यकीय मानकांनुसार उंची आणि वय

उंची :- पुरुषांसाठी 157 सेमी आणि महिलांसाठी 152 सेमी

छाती :- पुरुषांसाठी 80-85 सेमी (5 सेमी विस्तारित) (महिला उमेदवारांसाठी लागू नाही)

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!