JOB ALERT | ‘या’ विभागात सरकारी नोकरीच्या संधी; जाहिरात आली

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्ट: सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानं कनिष्ठ पर्यावरण अभियंता, कनिष्ठ लघुटंकलेखक (ज्यु. स्टेनोग्राफर) आणि नेटवर्क सहायक अशा विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविणारी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी पदवीधर, 12 वी उत्तीर्ण, आयटीआय आदी शैक्षणिक पात्रता ठेवली आहे. अर्ज बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट goa.gov.in वर उपलब्ध आहे.
8 ऑक्टोबर रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज सादर करावा
अर्ज भरून उमेदवारांनी अध्यक्ष, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, पिळर्ण इंडस्ट्रीयल इस्टेटजवळ, सालीगाव, बर्देझ, गोवा – 403511, यांच्याकडे पाठवावा लागणार आहे. इच्छुक उमेदवारांना 8 ऑक्टोबर रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज सादर करावा लागेल.
कुठल्या पदांसाठी जाहिरात?
सरकारी रिझल्ट: रिक्त पदांचा तपशील
कनिष्ठ पर्यावरण अभियंता : एकूण 5 पदे
कनिष्ठ लघुटंकलेखक : 1 पद
नेटवर्क सहायक : 1 पद
सरकारी नोकरी: निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड वरील पदांवर स्पर्धा परीक्षा किंवा कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल. भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेत असं म्हटलं आहे की, ‘परीक्षेच्या अभ्यासक्रमात आवश्यक योग्यता, सामान्य ज्ञान, तर्क क्षमता, परिमाणात्मक योग्यता आदीवर आधारित प्रश्न असतील. ते पदांसाठी आवश्यक पदवी किंवा पातळीशी संबंधित असतील. यासह, परीक्षा एकूण 100 गुणांची असेल, यासाठी दोन तासांचा वेळ दिला जाईल, असंही नोटीसमध्ये म्हटलंय.