JOB ALERT | जीएमसीमध्ये नोकरीच्या संधी; लगेच अर्ज करा

अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी सविस्तर बातमी वाचा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ‘गोवन वार्ता लाईव्ह’ काही खास माहिती घेऊन आलंय. बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) येथे नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. कुठल्या पोस्टसाठी अर्ज मागवलेत? मुलाखत कधी होणार आहे? त्याठिकाणी अप्लाय कसं करायचं? पगार किती मिळू शकेल, या संदर्भातली माहिती घेऊन ‘गोवन वार्ता लाईव्ह’ आलं आहे. त्यामुळे ही माहिती जर तुम्हाला, तुमच्या मित्रमैत्रिणींनी उपयोगी पडणार असेल, तर त्यांना शेअर करायला विसरु नका.

हेही वाचाः ओबीसी समाजातील 27 मंत्र्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान

बांबोळीतील जीएमसीमध्ये कंत्राटी तत्त्वावर तसंच रजापद तत्त्वावर नेमणूक करायच्या आहेत. लोवर डिव्हिजन क्लर्क, स्पीच थेरापिस्ट या पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेत.

हेही वाचाः देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प घट, कोरोनाबळी मात्र वाढले

लोव्हर डिव्हिजन क्लर्क पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

लोव्हर डिव्हिजन क्लर्क पद 13 ऑक्टोबर 2021 पर्यंत किंवा सदर नियमित कर्मचारी सेवेत पुन्हा रुजू होईपर्यंत भरण्यात येत आहे. या पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेकडून उच्च माध्यमिक विद्यालय प्रमाणपत्र किंवा तत्सम पात्रता, कंप्युटरचं ज्ञान, कोकणी भाषेचं ज्ञान तसंच मराठीचं ज्ञान (ऐच्छिक) असलेले अर्ज करू शकतात. या पदासाठी दर महिना रु. 18 हजार 34 वेतन दिलं जाणार आहे.

लोव्हर डिव्हिजन पदासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारासाठी नियम आणि अटी

लोव्हर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार हे 45 वर्षांपेक्षा जास्त नसावेत. या नियमातून सरकारी कर्मचाऱ्यांना शिथिलता देण्यात आलीये. या पदांसाठीच्या मुलाखती या थेट होणार अजून 16 जुलै 2021 रोजी बांबोळी येथील जीएमसीच्या डीन यांच्या कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये सकाळी 10.30 वा. घेण्यात येणार आहेत.

हेही वाचाः गोवा मुक्तीदिनी बायणा उड्डाणपूल वाहतूकीस खुला

उमेदवाराने सोबत येताना अर्ज, प्रमाणपत्र आणि कागदपत्रे यांच्या मूळ आणि झेरॉक्स प्रतीसह इतर डॉक्युमेंट्स घेऊन सकाळी 10 पर्यंत मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित रहावं. त्यानंतर आलेल्या उमेदवारांचा विचार मुलाखतीसाठी केला जाणार नाही. त्याचप्रमाणे या मुलाखतीला उपस्थित राहिल्याबद्दल टीए डीए दिला जाणार नाही, असं सांगण्यात आलंय.

हेही वाचाः भरधाव इनोव्हाची गुरांना धडक! दोन गुरं जागीच दगावली

स्पीच थेरापिस्ट पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

स्पीच थेरापिस्ट पद 24 जानेवारी 2023 पर्यंत भरण्यात येणार आहे. या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून स्पीच थेरपी आणि ऑडिओलॉजीमधील बी.एस्सी किंवा तत्सम पदवी असंण आवश्यक आहे. तसंच अध्यापन संस्थेतील वाणी दोषांच्या व्यवस्थापनाचा किमान 1 वर्षाचा अनुभव आणि कोकणी तसंच मराठी (ऐच्छिक) ज्ञान असलेले अर्ज करू शकतात. या पदासाठी दर महिना रु. 21 हजार 120 रुपये वेतन दिलं जाणार आहे.

हेही वाचाः देशभरातील हाय प्रोफाइल पार्ट्यांमध्ये ड्रग्ज पुरवणारा गजाआड

स्पीच थेरापिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारासाठी नियम आणि अटी

स्पीच थेरापिस्ट पदासाठी अर्ज करणारे उमेदवार हे 45 वर्षांपेक्षा जास्त नसावेत. या नियमातून सरकारी कर्मचाऱ्यांना शिथिलता देण्यात आलीये. या पदांसाठीच्या मुलाखती या थेट होणार अजून 16 जुलै 2021 रोजी बांबोळी येथील जीएमसीच्या डीन यांच्या कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये दुपारी 2.30 वा. घेण्यात येणार आहेत.

हेही वाचाः अभिनेता सलमान खानसह बहिणीविरोधात पोलिसात तक्रार

उमेदवाराने सोबत येताना अर्ज, प्रमाणपत्र आणि कागदपत्रे यांच्या मूळ आणि झेरॉक्स प्रतीसह इतर डॉक्युमेंट्स घेऊन दुपारी 2 पर्यंत मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित रहावं. त्यानंतर आलेल्या उमेदवारांचा विचार मुलाखतीसाठी केला जाणार नाही. त्याचप्रमाणे या मुलाखतीला उपस्थित राहिल्याबद्दल टीए डीए दिला जाणार नाही, असं सांगण्यात आलंय.

हेही वाचाः मोठी कारवाई! GST चोरीप्रकरणी गोव्यात पहिल्यांदाच दोघांना अटक

इतर तपशील किंवा सूचना किंवा निवडीची प्रक्रिया, निकाल इ. गोष्टी जाणून घेण्यासाठी www.gmc.goa.in या जीएमसीच्या संकेतस्थळाला भेट देण्यात सांगण्यात आलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!