JOB ALERT | आरोग्य सेवा संचालनालयाकडून नोकरीच्या संधी; लगेच अर्ज करा

24 ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख, त्वरा करा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ‘गोवन वार्ता लाईव्ह’ काही खास माहिती घेऊन आलंय. पणजीतील कांपाल येथील आरोग्य सेवा संचालनालयात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. कुठल्या पोस्टसाठी अर्ज मागवलेत? मुलाखत कधी होणार आहे? त्याठिकाणी अप्लाय कसं करायचं? पगार किती मिळू शकेल, या संदर्भातली माहिती घेऊन ‘गोवन वार्ता लाईव्ह’ आलं आहे. त्यामुळे ही माहिती जर तुम्हाला, तुमच्या मित्रमैत्रिणींनी उपयोगी पडणार असेल, तर त्यांना शेअर करायला विसरु नका.

कोणत्या पदांसाठी मागविले अर्ज?

आरोग्य सेवा संचालनालयाने जारी केलेल्या जाहिरातीनुसार स्टाफ नर्स (114 पदं), स्टीवार्ड (1 पद), ज्युनिअर स्टेनोग्राफर (2 पदे), ऑप्थलमिक असिस्टंट (4 पदं), एक्स्टेन्शन एज्युकेटर (4 पदं), एक्स-रे टेक्निशियन (2 पदं), फार्मासिस्ट (14 पदं), लॅबोरेटरी टेक्निशियन (12 पदं), ब्लड बँक टेक्निशियन (1 पद), इकेक्ट्रिशियन (2 पदं), असिस्टंट बायोकेमिस्ट (1 पद), सोशल वर्कर (3 पदं). ईसीजी टेक्निशियन (1 पद), पब्लिक रीलेशन ऑफिसर (1 पद), एमपीएचडब्ल्यू (पु)/एमपीएचडब्ल्यू (म)/एएनएम (62 पदं), इन्सेक्ट कलेक्टर (2 पदं), प्लंबर (2 पदं), बार्बर (2 पदं), असिस्टंट कूक (14 पदं) रिक्त आहेत.

प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता वेगवेगळी आहे, जी जाहिरातीत स्पष्ट नमूद करण्यात आली आहे. दरम्यान सर्व पदांसाठी कोकणीचं ज्ञान हे अनिवार्य असून मराठीचं ज्ञान ऐच्छिक आहे. या पदांसाठी अर्ज करणारे इच्छुक उमेदवार हे 18 वर्षांपेक्षा कमी आणि 45 वर्षांपेक्षा जास्त नसावेत.

24 ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख

आरोग्य सेवा सचालनालयाने रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात जारी केली आहे. संचालनालयाकडून जाहिरातीत देण्यात आलेल्या विहित नमुन्यामधील खालील ग्रुप ‘सी’ पदे भरण्याकरिता तपशील जसे पूर्ण नाव, संपूर्ण रहिवासी पत्ता, जन्म प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता, वैध रोजगार नोंदणी पत्र / क्रमांक, प्रवर्ग प्रमाणपत्र (जेथे आवश्यक आहे), सक्षम प्राधिकाऱ्यांनी जारी केलेले गोव्यामध्ये १५ वर्षे रहिवासी असलेल्या प्रमाणपत्राच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रतीसह देऊन कोऱ्या कागदावर अर्ज मागविण्यात आले आहेत. अपूर्ण अर्ज (वैध सहपत्राशिवाय) नाकारण्यात येतील असं आरोग्य सेवा संचालनालयाकडून सांगण्यात आलंय. पूर्ण भरलेले अर्ज कांपाल येथील आरोग्य सेवा संचालनालयाच्या कार्यालयात २४/०८/२०२१ रोजी किंवा त्यापूर्वी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पोहोचले पाहिजेत, असं संचालनालयाकडून कळविण्यात आलंय.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | TRIBAL WELFARE| आदिवासी कल्याण भवनाची पायाभरणी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!