मांद्रेमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांनी परवानगी द्यावी- जीत आरोलकर

पत्र लिहून कोविड केअर सेंटर उभारण्याची मागितल परवानगी

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

मांद्रे : कोविड -१९ या साथीच्या दुसर्‍या लाटेदरम्यान, पेडणे तालुक्यात जलद गतीने वाढ झाली आहे. कोविड 19चे रुग्ण वेगानं वाढत आहेत. सध्या पेडणे तालुक्यात कोविड केअरची सुविधा किंवा आयसोलेशान केंद्र नाहीत, त्यासाठी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी मांद्रे भागात कोविड केअर सेंटर उभारण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जीत आरोलकर यांनी केली आहे. तसं पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांनी लिहिलंय.

रुग्णांसाठी सुविधान नसल्यामुळे तालुक्यातील जनतेची गैरसोय होतेय. कोरोनाची साखळी मोडीत काढण्यासाठी मांद्रे उदार्गात संस्थेने यात आपला सहभाग दाखवण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितलेली आहे .

जीत आरोलकर यांनी म्हटलंय की,

कोविड रूग्णांना वेगळे ठेवण्यासाठी कोविड आयसोलेशान केंद्र सुरू करण्याचे आम्ही नियोजन केले आहे. पेडणे तालुक्यात ज्यांना सौम्य संसर्ग आहे, त्यांना होम आयसोलेशनची सुविधा नाही. या सोयीसाठी मान्द्रेतील एका हॉटेलात असलेल्या 20 खोल्यांचं नियोजित केंद्र कोरोना केंद्र स्थापित केले जाईल. वेळप्रसंगी अतिरिक्त बेडची सोय करण्याची संस्थेची तयारी आहे.

मांद्रे उदर्गत स्वतंत्रपणे प्रवेश केलेल्या रूग्णांच्या सर्व खर्चाचीही काळजी घेणार असल्याचं जीत आरोलकर यांनी म्हटलंय. केंद्र सुरु झाल्यानंतर सर्व रुग्णांना त्यांच्या आयसोलेशन कालावधी दिवसाचे 4 जेवण दिले जाईल. त्याचप्रमाणे रुग्णांचा सर्व वैद्यकीय खर्च याची जबाबदार आमच्यावर असेल. तशी काळजी घेतली. या केंद्रात आम्ही डॉक्टरांची नेमणूक करण्याचे ठरविले आहे. ते डॉक्टर प्रवेश घेतलेल्या रूग्णाच्या आरोग्याची तपासणी करतील, असंही जीत आरोलकर यांनी नमूद केलंय.

दररोज आणि आवश्यकतेनुसार रुग्णांना वैद्यकीय सहाय्य प्रदान केले जाईल. आपत्कालीन परिस्थितीत २४ तास रुग्णवाहिका सेवादेखील असेल, अशी ग्वाही जीत आरोलकर यांनी दिली आहे . या सोयीसाठी सरकारने आम्हाला परवानगी द्यावी, अशी मागणी जीत आरोलकर यांनी संस्थेतर्फे केली आहे. पेडणे कोरोना सेंटर आणि तुये कोविड केअर सेंटरवरील ओझे कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे त्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

सध्या तुये येथे एकमेव हॉस्पिटल आहे जे कोविड चाचणी आणि लसीकरण प्रदान करते. मांद्रे मतदारसंघाच्या किनारपट्टी भागातील लोक गरीब असल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे म्हणून आम्ही COVID चाचणी सुविधा स्थापित करण्यासाठी विनंती करू इच्छितो आणि किनारपट्टीवरील लोकांना त्याचा लाभ घेण्यास सुलभ करण्यासाठी या परिसरातील लसीकरणाची सुविधा देण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे जीत आरोलकर यांनी म्हटलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!