जीत आरोलकर यांचा लवकरच मगोप प्रवेश

पेडणे तालुक्यातील मांद्रे आणि पेडणे या दोन्ही मतदारसंघातून आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मगोचे आमदार निवडून आणण्यासाठी या तालुक्यामधून यापूर्वीच मगोपने कार्य सुरू केले आहे.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे : मगो पक्षाला उभारी देण्यासाठी आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीत पेडणे तालुक्यातील दोन्ही मंतदारसंघातून मगोपचे आमदार निवडून आणण्यासाठी मांद्रे मतदारसंघातून जीत आरोलकर (Jit Arolkar), तर पेडणे मतदारसंघातून उद्योजक प्रवीण आर्लेकर (Praveen Arlekar) प्रवेश करणार आहेत.

पेडणे तालुका हा मगोपचा बालेकिल्ला आहे. पक्षाला परत एकदा उभारी देऊन गतवैभव प्राप्त करण्यासाठी युवा शक्ती सज्ज झाली आहे. पेडणे तालुक्यातील मांद्रे आणि पेडणे या दोन्ही मतदारसंघातून आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मगोचे आमदार निवडून आणण्यासाठी या तालुक्यामधून यापूर्वीच मगोपने कार्य सुरू केले आहे.

2017 च्या निवडणुकीत पेडणे मतदारसंघातून मगोपचे आमदार म्हणून बाबू आजगावकर याना निवडून आणले. मात्र कालांतराने त्यांनी भाजपात प्रवेश केला.

मांद्रे मतदार संघ
जीत आरोलकर यांनी मांद्रे मतदारसंघावर बरीच पकड बसवलेली आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून जीत आरोलकर यांना मगोपने पाठिंबा दिला होता. त्यावेळी त्यांनी साडेनऊ हजार मते घेतली होती. भाजपाचे उमेदवार दयानंद सोपटे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले होते. ते मांद्रे मतदारसंघातून मगोपतर्फे आगामी निवडणूक लढवणार आहेत.

पेडणे मतदार संघ
पेडणे या राखीव मतदार संघातून आगामी विधानसभेच्या निवडणुकीत पर्रा येथील उद्योजक प्रवीण आर्लेकर हे मगोपतर्फे निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. लवकरच ते मगोपत प्रवेश करणार आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!